कोयनेतून आजपासून दुप्पट विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये आवक वाढली आहे. त्यामुळे गुरुवारपासून (दि. 27) विसर्ग (dissolution) दुप्पट केला जाणार आहे. दरम्यान, अलमट्टीतून बुधवारी 75 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तर चांदोली धरणातून 2 हजार 456 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सध्या कोयना नदीमध्ये 1050 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तो आता 2 हजार 100 करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.
उद्या, 27 जुलैला दुपारी चार वाजता कोयना धरणाच्या पायथ्याशी विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कोयना धरणातून विसर्ग (dissolution) वाढवणार आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट कार्यान्वित असून कोयना नदीमध्ये 1 हजार 50 क्यूसेक प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. तथापि, आज गुरुवारी दुपारी चार वाजता पायथा विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करण्यात आल्यानंतर नदीपात्रात प्रतिसेकंद एकूण 2100 क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.