कतरिना कैफचा ‘टायगर 3’मधला थरारक सीन लीक!

(entertenment news) सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘टायगर 3’ ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाचा टिझर रिलिज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखीच वाढली आहे. आता सलामान आणि कतरिनाच्या चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा लागली आहे.

लवकरच सलमानच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज होणार आहे तर ‘टायगर 3’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे पुन्हा सलमान आणि कतरिनाची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. यात सलमान भारताच्या रॉ एजंट टायगरच्या भूमिकेत तर कतरिना कैफ झोयाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘टायगर 3’ हा बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चाहते सलमान आणि कतरिनाची दमदार अ‍ॅक्शन पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

तर यातील सलमान खानचा लूक तर काही दिवसांपुर्वी शेयर करण्यात आला होता मात्र आता ‘टायगर 3’ मधील कतरिना कैफचा अॅक्शन सीन लीक झाला आहे. सध्या कतरिनाचा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अॅक्शन फोटोमध्ये कतरिना कैफ बाईकवरून उडी मारताना दिसत आहे. हा चित्रपटातील अॅक्शन सीन आहे मात्र यात तिचा चेहरा दिसत नाही. तिने काळ्या रंगाचा ड्रेस आणि काळे हेल्मेट घातले आहे. या फोटोतील व्यक्ती कतरिना असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा व्हायरल फोटो पाहून ती कतरिना नसून तिची स्टंट बॉडी डबल आहे असं देखील तिचे चाहते बोलत आहेत.

यशराज फिल्म्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर सलमान खान आणि कतरिना कैफचा फर्स्ट लूक शेअर करून या चित्रपटाची घोषणा केली होती.

या चित्रपटात शाहरुख खानचा कॅमिओही दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफसोबत इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *