अंबाबाई मंदिर गाभारा आज राहणार बंद
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर (temple) आवाराची स्वच्छता, शिखरांची रंगरंगोटी पूर्ण करण्यात येत आहे. आज (सोमवार)पासून गाभारा स्वच्छता सुरू होणार असून, यामुळे गाभारा बंद राहणार असल्याने सायंकाळी सातपर्यंत भाविकांना अंबाबाई देवीचे दर्शन होउ शकणार नाही. या काळात भाविक उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊ शकतील.
अंबाबाई मंदिराची स्वछता सुरू आहे. आवारातील मंदिरे, सटवाई चौक, शिखरे, दीपमाळा, मुखदर्शन मंडपाची सफाई पूर्ण करण्यात आली. आज सकाळची आरती झाल्यानंतर गाभारा स्वच्छता सुरू करण्यात येणार आहे. या काळात मूर्तीच्या संरक्षणासाठी इरले घातले जाईल.
सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या कालावधीत गाभारा स्वच्छता चालणार आहे. या काळात देवीचे दर्शन होऊ शकणार नाही. भाविकांसाठी सरस्वती मंदिरासमोर (temple) उत्सवमूर्ती ठेवण्यात येणार असून, येथे दर्शन घेता येईल.