जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे 10 जणांचा मृत्यू
जिल्ह्यातून अजूनही स्वाईन फ्लू (Swine flu) हद्दपार झालेला नाही. या संसर्गाची दहशत कायम आहे. दहा महिन्यांत दहा जणांना स्वाईन फ्लूमुळे जीव गमवावा लागला आहे. मृतांत जिल्ह्यातील 9, तर अन्य जिल्ह्यांतील एका रुग्णांचा समावेश आहे. स्वाईन फ्लू संसर्ग तपासणीसाठी 143 जणांचे नमुने प्राप्त झाले होते. यात 4 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 139 व्यक्तींना स्वाईन फ्लूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये 81 पुरुष, तर 58 महिलांचा समोवश आहे.
संसर्ग झालेल्यांमध्ये 101 रुग्ण औषधांनी बरे झाले. 10 रुग्णांनी नॉन इव्हेजिव व्हेंटिलेटर, 18 रुग्णांनी ऑन ओटू उपचार, तर 10 जणांनी व्हेंटिलेटरवर उपचार घेतले आहेत. सीपीआरमध्ये 1, तर 138 रुग्णांनी खासगीत उपचार घेतले आहेत. दोन दिवसांपूर्वी दोघांनी स्वाईन संसर्गावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज केले आहे. सध्या जिल्ह्यात स्वाईन फ्लू (Swine flu) संसर्गाचे रुग्ण नाहीत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी दिली.