तनुश्री दत्ताने राखी सावंत विरुद्ध नोंदवला FIR; नाना पाटेकर यांच्यावर टिका

(entertenment news) तनुश्री दत्ता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तनुश्रीने काही दिवसांपुर्वी राखी सावंतचा पती आदिल खान सोबत प्रेस कॉन्फरन्स घेऊन राखी सावंतवर गंभीर आरोप करुन आदिलला सपोर्ट केला. आता तनुश्रीने राखी सावंतविरुद्ध FIR नोंदवत तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय नाना पाटेकर यांच्यावर टिका केलीय. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

राखी सावंत विरुद्ध नोंदवला FIR

राखी सावंत विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर तनुश्री दत्ताने मीडियाशी संवाद साधला याशिवाय आता पोलीस राखीवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तनुश्री म्हणाली, ‘हे संपूर्ण प्रकरण 2008 सालचे आहे, जेव्हा राखीला हॉर्न ओके प्लीज या चित्रपटातून रिप्लेस करण्यात आले होते. आणि तेव्हापासून तिला माझ्यासोबत समस्या होत्या. त्यानंतर माझ्यासोबत वाद निर्माण केल्यानंतर निर्मात्यांनी राखीला परत सिनेमात घेतलं.”

“यानंतर, 2018 मध्ये MeToo चळवळीदरम्यान, मला राखीमुळे खूप भावनिक आघात सहन करावे लागले. ती माझ्या विरोधात जे काही बोलली त्याचे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. आता तिच्या चुकीच्या माफी नाही.”

तनुश्री पुढे म्हणाली, “राखीमुळे निर्मात्यांनी माझे सर्व चेक बाऊन्स केले. निर्मात्यांनी अशी चुकीची कामे करू नयेत असे मी म्हणेन. त्यावेळी मी सुप्रसिद्ध कलाकार होते. मी चांगले चित्रपट केले होते. आशिक बनाया आपने हा चित्रपटही गाजला होता. अशा परिस्थितीत ते गाणे रिलीज झाले असते तर मला आणखी काम मिळाले असते. निर्मात्याचेही भले झाले असते. पण या सर्व प्रकरणात मला खूप भावनिक आघात सहन करावा लागला.” (entertenment news)

तनुश्री दत्ताने तिच्या संभाषणात नाना पाटेकरांचा उल्लेख केला आणि म्हणाली, ‘नाना पाटेकरांनी स्वतःची अशी प्रतिमा निर्माण केली आहे की ते समाजसेवा करतात. मात्र ते केवळ पत्रकार परिषदेत समाजसेवेबद्दल बोलतात आणि पुरावे कधीच दाखवत नाहीत. चांगला माणूस तोच असतो जो आपल्या कुटुंबासोबत राहतो. अभिनेत्रींशी संबंध जोडणे किंवा त्यांच्यासोबत अफेअर असणे हे चांगल्या माणसाचे लक्षण नाही. नाना पाटेकर यांचे त्यांच्या कुटुंबियांशी संबंध चांगले नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. ते पत्नी आणि मुलासोबत राहत नाही. इंडस्ट्रीत त्यांनी त्यांच्या मुलालाही साथ दिली नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *