अंबाबाई मंदिरात घटस्थापनेने शारदीय नवरात्राैत्सवाला प्रारंभ
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज (रविवार) सकाळी ७.३० वाजता घटस्थापना पुण्याहवाचन करण्यात आले. ८ वाजण्याच्या सुमारास तोफेची सलामी देण्यात आली. घंटानाद व देवीच्या स्नानास प्रारंभ झाला. घटस्थापना विधींनी देवीच्या नवरात्राैत्सव सोहळ्याला (ceremony) सुरुवात झाली.
सकाळी ११.३० वाजता धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. दुपारी २ वाजता देवीची अलंकार पूजा बांधली जाणार आहे. पहिल्या दिवशी पारंपरिक बैठी पूजा असणार आहे. रात्री ९.३० वाजता देवीचा पालखी सोहळा (ceremony) होईल. दर्शनासाठी सकाळपासून मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे. मुख्य दर्शन रांगेसोबत मुख दर्शनाला भाविकांचा प्रतिसाद मिळत आहे. रविवार असल्याने जोतिबा डोंगरावर दर्शनाला आलेले भाविकही कोल्हापुरात दाखल होत आहेत.