अचानक बीपी कमी झाला तर करा हे 3 घरगुती उपाय

आजकाल बहुतेक लोकांना बीपीची समस्या असते. धावपळीचे जीवन, ताण तणाव अशा अनेक गोष्टींमुळे लोकांना बीपीची समस्या निर्माण होते. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे देखील बीपी कमी (Lower BP) होण्याची शक्यता असते. त्यासाठी रक्ताचा समतोल राखणं आवश्यक आहे. बहुतेक लोकांचा अचानक बीपी लो होतो. बीपी लो होण्यामुळे अशक्तपणा येतो, चक्कर येते किंवा अस्वस्थ वाटतं.

बीपी कमी झाल्यानंतर कोमट दूध पिणे फायदेशीर ठरते. कोमट दूध पिल्यामुळे तुमचा बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते. तर तुम्हाला बीपी लो झाल्यानंतर चक्कर आली किंवा अस्वस्थ वाटलं तर थोडं दूध गरम करा आणि ते शांत बसून प्या. यामुळे तुमचा बीपी नियंत्रणात येईल. दुधामध्ये कॅल्शियम, ओमेगा फैट्स असे अनेक गुणधर्म असतात जे आपल्या रक्तवाहिन्यांसाठी खूप उपयुक्त असतात. तर जेव्हाही तुमचा बीपी लो होईल तेव्हा कोमट दूध जरूर प्या.

तुमचा बीपी अचानक कमी (Lower BP) झाला तर अशावेळी तातडीने मीठाचे सेवन करावे. जेव्हाही बीपी लो होईल तेव्हा पाण्यात थोडं मीठ टाकून ते पाणी प्या. मीठामध्ये सोडियम असते जे आपला रक्तदाब सुधारण्यास मदत करते. त्यामुळे बीपी देखील नियंत्रित राहतो. तुम्हाला बीपीची समस्या असेल आणि तुमचा बीपी अचानक कमी झाला असेल तर थोडं मीठ तुम्ही चाटून घेऊ शकता किंवा पाण्यात मिसळून ते पिऊ शकता. यामुळे तुमचा बीपी नियंत्रण येण्यास मदत होईल.

जेव्हा तुमचा बीपी कमी होईल तेव्हा एक हार्ड अशी कॉफी प्या. कॉफी पिल्यामुळे तुमचा बीपी नियंत्रणात येण्यास मदत होईल. बहुतेक लोकांना हार्ड कॉफी पिण्यास खूप आवडते. तर जेव्हाही तुमचा बीपी लो होईल तेव्हा हार्ड कॉफी जरूर प्या. हार्ड कॉफी ही आपल्या नॉर्मल कॉफीपेक्षा खूप वेगळी असते. तर या कॉफीमध्ये पुरेशा प्रमाणात दूध टाका आणि त्यानंतर ती कॉफी बनवा. ही कॉफी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तसेच तुमचा बीपी देखील नियंत्रण आणण्यास मदत करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *