महिन्याभरापूर्वीच मिळतात Heart Attack चे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष!

हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) कधीच अचानक येत नाही. परंतु याआधी त्या आधीच आपल्याला शरीर काही हिंट देत असते. पण त्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर त्याचा मोठा धक्का बसण्याची शक्यता असते.

संशोधनात आलं सत्य समोर

हृदयविकाराच्या झटक्याच्या (Heart Attack) महिन्याभरापूर्वीच आपले शरीर धोक्याचे संकेत देते.जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, हृदयविकाराचा झटका येण्याच्या सुमारे 1 महिन्यापूर्वी त्याचे धोक्याचे संकेत दिसायला लागतात.

कसा केला अभ्यास?

हा अभ्यास 500 हून अधिक महिलांवर करण्यात आला आणि त्यांना हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवण्यात आले.

95 टक्के महिलांनी जाणवल्या ‘या’ गोष्टी

सुमारे 95 टक्के महिलांनी सांगितले की, त्यांच्या शरीरात एक महिन्यापूर्वीच काही लक्षणे दिसू लागली आहेत.

कोणत्या समस्या असतात गंभीर

हृदयाची धडधड अधिक वाढणे, भूक न लागणे, हात आणि पायांना मुंग्या येणे, रात्री श्वास लागणे (धाप लागणे), अशक्तपणा किंवा हातात जडपणा येणे या काही समस्या तुम्हाला जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

झोपे संबंधीत समस्या

जर तुम्हाला हृदयविकाराची समस्या असेल तर तुम्हाला झोपे संबंधीत समस्या उद्भवू शकता. झोप येत नाही. त्याशिवाय, नेहमी थकवा जाणवणे, अपचनाचा त्रास होणे, नैराश्यात भर पडणे, नजर कमजोर होत जाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *