नवरात्रीत ट्राय करा झटपट बनणारा बटाट्याचा पराठा

काही लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास ठेवतात. रोज रोज उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही शाबुदाणा खिचडीऐवजी बटाट्याचा पराठा ट्राय करू शकता.

बटाट्याचा पराठा बनवण्यासाठीचे साहित्य

१ कप शाबुदाणा

२ उकळलेले बटाटे

कुटलेली लाल मिर्ची एक चमचा

जिरे (cumin)

काळे मीठ

कोथिंबीर बारीक कापलेली

तूप

बनवण्याची पद्धत

सगळ्यात आधी बटाटे उकळून चांगले मॅश करून घ्या.

आता शाबुदाणा पॅनमध्ये घालून ड्राय रोस्ट करा. ज्यामुळे त्यातील चिकटपणा जाण्यास मदत होईल.

आता मिक्सरमध्ये शाबुदाणा बारीक करून घ्या.

आता शाबुदाण्याची पावडर प्लेटमध्ये काढा. आणी मॅश केलेले बटाटे त्यात मिसळा.

त्यात बारीक कापलेली कोथिंबीर घाला.

कुटलेली लाल मिर्ची आणि काळे मीरेही घाला.

आता जीरे (cumin) आणि रॉक सॉल्ट घालून मिक्स करून घ्या.

आता बटाटे आणि शाबुदाण्याच्या पावडरचे पीठ नीट मळून घ्या.

गरज पडल्यास पाणी घ्या नाहीतर बटाट्याच्या मदतीने पीठ मळून घ्या.

तवा गॅसवर ठेवून गरम करा. आणि पराठा लाटण्याच्या तयारीला लागा.

हा पराठा चिकटू नये म्हणून गॅस ओट्यावर बटर पेपर किंवा स्वच्छ टॉवेल पसरवा त्यावर मळलेल्या पिठाचा गोळा ठेवा. त्यावर आणखी एक बटर पेपर किंवा स्वच्छ टॉवेल ठेवून पराठा लाटून घ्या.

आता हळून हा पराठा ताव्यावर ठेवून त्यावर तूप घाला. आणि सोनेरी होतपर्यंत शिजू द्या.

तुमचा टेस्टी बटाट्याचा पराठा अगदी रेडी आहे. तुम्ही शेंगदाण्याच्या किंवा नारळाच्या चटणीसह हा पराठा खाऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *