उपवासात ट्राय करा वरईचे टेस्टी कटलेट

आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. जे लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात त्यांना शाबुदाणा खिचडी, वरईचा भात खाऊन कंटाळाही येतो. अशावेळी नवीन काय खावे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला वरईच्या आगळ्यावेगळ्या डिशबाबत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया झटपट बनणारी ही रेसिपी.

या डिशच्या सेवनातून तुम्हाला प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स मिळतात. उपवासात तुम्हाला याच्या सेवनातून एनर्जी आणि स्फूर्ती मिळेल.

वरईपासून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता. जसे की खीर, खिचडी, पुरी, डोसा, चिला, कचोरी बनवू शकता. तुम्ही वरईच्या भातापासून कटलेटसुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

वरईच्या कटलेटसाठी लागणारे साहित्य

एक कप शिजवलेला वरईचा भात

बटाटे – एक कप उकळलेले बटाटे (potato)

गाजर – एक कप किसलेले

जीरे – १ छोटा चमचा जिरे

हिरवी मिर्ची – २ बारीक कापलेल्या हिरव्या मिर्च्या

काळे मीरे – १ छोटा चमचा

आमचूर पावडर – १ चमचा

सेंधा मीठ – चवीनुसार

कोथिंबीर – कापलेली

तेल

बनवण्याची पद्धत

एका पातेल्यात शिजवलेला वरईचा भात घ्या. त्यात उकळलेले बटाटे (potato) घालून मॅश करून घ्या. आता त्यात गाजर, हिरवी मिर्ची, काळे मीरे, जीरे घालून चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या.

आता या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल बनवून त्याला कटलेटप्रमाणे शेप द्या. पॅनला गॅसवर ठेवा. त्यात थोडे तेल घाला. आता एकावेळी तीन ते चार कटलेट पॅनमध्ये घालून त्याला शिजू द्या. दोन्ही बाजूने गोल्डन ब्राउन होतपर्यंत पॅनमध्ये ठेवा. शिजल्यानंतर प्लेटमध्ये काढा. तुमचे उपवासाचे कटलेट तयार आहेत. हे तुम्ही शेंगदाण्याच्या किंवा काकडीच्या चटणीसोबतही सर्व्ह करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *