आधी स्वत:चे आमदार सांभाळा : हसन मुश्रीफ

(political news) अजित पवार यांच्याबरोबर गेलेले पंधरा आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा दावा करणारे जयंत पाटील यांनी आपल्या सोबतचे आमदार आधी सांभाळावेत. पंधरा आमदार संपर्कात आहेत, असे ते म्हणत असतील तर त्यांनी एका तरी आमदाराला सोबत घेऊन दाखवावे, आपण त्यांचा सत्कार करू, अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना टोला लगावला.

दसरा महोत्सवातील एका कार्यक्रमानंतर शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलत होते. राजकारणात अनेक वेळा असे काही बोलावे लागते, तसे जयंत पाटील बोलले असतील, असा दावा करून मुश्रीफ म्हणाले, प्रत्येकजण असे दावे-प्रतिदावे करू शकतो.

ललित पाटीलप्रकरणी विचारता मुश्रीफ म्हणाले, मुळात तो आजारी होता काय, त्याला कोणता आजार होता, नसेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा सल्ला कोणी दिला, याचा तपास सुरू आहे. यात दोषी आढळणार्‍या डॉक्टरांवर कारवाई केली जाईल. वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून एवढाच आपला या प्रकरणाशी संबंध येतो. (political news)

मराठा आरक्षणप्रश्नी ज्येष्ठ मंत्री विचारविनिमय करतील

कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केले आहे. त्यावर ज्येष्ठ मंत्री विचारविनिमय करतील. त्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही मुश्रीफ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *