सणासुदीला ग्राहकांची होणार चंगळ!

शारदीय नवरात्रीसह देशभर सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. सणासुदीला बाजारात चोहीकडे ऑफर्स, सूट आणि सेल सुरू असताना ग्राहकांनाही (Customers) खरेदीचा मोह आवरत नाही. दसरा-दिवाळीसाठी मोठ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी सणासुदीचा काळ ग्राहकांसाठी फायद्याचा ठरतो. कारण या निमित्त कंपनी किंवा बँका ऑनलाईन तसेच ऑफलाइन खरेदीवर भरघोस सूट देतात. यासोबतच निवडक बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर अतिरिक्त सवलत उपलब्ध असून आज आम्ही तुम्हाला अशाच एका बँकेच्या कार्डच्या ऑफर्सबद्दल सांगत आहोत, ज्यावर नवरात्री आणि दिवाळीदरम्यान विशेष सूट उपलब्ध आहे.

बँक ऑफ बडोदा (BoB)

सणासुदीच्या काळात बँक ऑफ बडोदा ८.४०% दराने गृहकर्ज उपलब्ध करून देत आहे. विशेष म्हणजे बँकेने प्रोसेसिंग फीमध्ये संपूर्ण सूट जाहीर केली असून २० लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जावर ०.८०% सूट दिली जाईल. तसेच बँकेकडून १०.१०% व्याजदराने वैयक्तिक कर्ज दिले जात आहे. त्याच वेळी, कार कर्जावर ८.७०% प्रारंभिक व्याजदर असून प्रक्रिया शुल्क देखील शून्य आहे.

एसबीआय

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने देखील गृह कर्जाबाबत विशेष ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये ग्राहकांना (Customers) गृहकर्जाच्या व्याज दरावर ०.६५% पर्यंत सूट दिली जात असून ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लाभ मिळेल. गृहकर्जाच्या व्याजदरात सवलत नियमित गृहकर्ज, फ्लेक्सिपे, NRI, पगार नसलेल्या आणि अपना घर श्रेणीतील कर्जांसाठी असून कार कर्जावर शून्य प्रक्रिया शुल्क देखील आकारले जात आहे आणि ही ऑफर ३१ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू राहील.

एयू स्मॉल फायनान्स बँक

सणासुदीचा काळ लक्षात घेऊन AU स्मॉल फायनान्स बँकेने AU क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर ‘हार्ट टू कार्ट’ ऑफर सुरू केली आहे. बँकेचे कार्डधारक १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला अनेक व्यापाऱ्यांकडून खरेदी करून विविध प्रकारच्या सूट दिली जाईल.

एसबीआय कार्ड

SBI कार्डचे ग्राहक विविध भागीदार ब्रँडवर २७.५% पर्यंत कॅशबॅक आणि झटपट सवलत ऑफर मिळवू शकतात, ज्यात फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिंत्रा, रिलायन्स रिटेल ग्रुप, वेस्टसाइड, पॅन्टालून्स, मॅक्स, तनिष्क आणि TBZ (त्रिभुवनदान भिमाजी झवेरी) यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *