सोने-चांदीच्या दरवाढीच्या घोडदौडीला लगाम, किंमतीत घसरण

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा करण्यात येते. शास्त्रात सोन्याला माता लक्ष्मीच्या रूपात पाहिले जाते आणि असे मानले जाते की आज सोने (gold) खरेदी केल्याने तुमच्या संपत्तीत समृद्धी येते. आजच्या या दिवशी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि या शुभ संयोगामुळे सोने-चांदी दराच्या वाढत्या घोडदौडीला थोडी लगाम लागली आहे. गुडरिटर्न्सनुसार सराफा बाजारात मौल्यवान धातू २०० रुपयेहून अधिकने स्वस्त झाले, तर वायदे बाजारातही घसरण पाहायला मिळाली आहे.

सोने-चांदी झाले स्वस्त

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी, सोने आणि चांदी दोन्ही घसरणीसह व्यवहार करत आहेत. ५ डिसेंबर २०२३ रोजी परिपक्व (मॅच्युअर) होणारे सोन्याचे फ्युचर्स MCX वर १९० रुपये किंवा ०.३१ टक्के घसरणीनंतर ६०,५४६ रुपये प्रति १० ग्रॅम राहिले. सोन्याचा मागील बंद भाव ६०,७३६ रुपयांवर नोंदवला गेला होता. दरम्यान, ५ डिसेंबर २०२३ रोजी मॅच्युअर होणाऱ्या चांदीच्या फ्युचर्समध्ये २०३ रुपये किंवा ०.२८% वाढ झाली आणि MCX वर ७१,८९५ रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत ७२,७०६ रुपये प्रति किलोवर भाव चढला.

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती सर्वोच्च स्तरावर ट्रेंड करत आहेत. या आठवड्यात महत्त्वपूर्ण आर्थिक डेटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन डॉलर आणि ट्रेझरी उत्पन्न मजबूत झाल्यामुळे सोन्याचे भाव सोमवारी गेल्या सत्रातील पाच महिन्यांच्या शिखरावरून खाली आले, अशी बातमी रॉयटर्सने दिली. ताज्या मेटल अहवालानुसार, स्पॉट गोल्ड ०.४% घसरून $१,९७२.३९ प्रति औंस, तर यूएस सोन्याचे फ्युचर्स ०.५% घसरून $१,९८३.५० वर आले आहेत. तसेच स्पॉट चांदीचा भाव ०.५% घसरून २३.२३ डॉलर प्रति औंस झाला आहे.

अमेरिकन बाजारातही सोमवारी सोन्याच्या (gold) दरात घसरण नोंदवली गेली. मजबूत यूएस ट्रेझरी उत्पन्नाने या आठवड्याच्या शेवटी मुख्य चलनवाढ आणि आर्थिक वाढीच्या डेटाच्या पुढे नॉन-इल्डिंग मालमत्तेची मागणी कमी केल्यामुळे मागील सत्रातील पाच महिन्यांच्या उच्च हिटपासून सोने खाली आले. शुक्रवारी सोन्याच्या किमती मध्य मे पासूनच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या होत्या आणि गुंतवणुकदारांनी इस्रायल-हमास यांच्यातील संघर्षादरम्यान सोन्यातील गुंतवणूक वाढवल्यामुळे जागतिक बाजारात सलग दुसरी साप्ताहिक वाढ नोंदवली गेलेली.

भारतातील महानगरांमध्ये सोने-चांदीचे भाव

नवी दिल्लीत प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोने ५६,७५० रुपये तर एक किलो चांदी ७५,३०० रुपये
मुंबईत प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोने ५६,६०० रुपये तर एक किलो चांदी ७५,३०० रुपये
कोलकात्यात १० ग्रॅम २२ कॅरेट सोने ५६,६०० रुपये तर एक किलो चांदी ७५,३०० रुपये
चेन्नईत १० ग्रॅम २२ कॅरेट सोने ५६,७०० रुपये तर एक किलो चांदी ७८,७०० रुपये आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *