गोपीचंद पडळकर यांचा पुन्हा शरद पवार यांच्यावर हल्लोबाल; सरकारला अल्टिमेटम

(political news) एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झालेला असतानाच आता धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. भाजप नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्याच सरकारच्या विरोधात दंड थोपाटले आहेत. कुणी कितीही राजकारण केले तरी धनगर समाज त्याला बळी पडणार नाही. मराठा समाज आणि धनगर समाज मोठे समाज आहेत. गरज पडली तर बाळू मामा व्हायचं नाही तर बापू बिरू वाटेगावकर व्हायचं, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. माझा सरकारला अल्टिमेटम आहे. तुम्ही काहीही करा, पण धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, अशी मागणीही पडळकर यांनी केली.

सांगलीत धनगर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गोपीचंद पडळकर बोलत होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी एका नव्या संघटनेची स्थापना केली. हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेची पडळकर यांनी स्थापना केली. ही अराजकीय संघटना असेल. फक्त मेंढपाळ समाजासाठीच ही संघटना काम करेल, अशी घोषणाच गोपीचंद पडळकर यांनी केली. शरद पवार 1990 ला मुख्यमंत्री होते. त्यावेळी धनगरांना आरक्षण मिळाले असते. पण तसे झाले नाही. पण आता धनगरांना आरक्षणाच्या आड कोणी आला तर त्याला तुडवू, असा इशाराच त्यांनी दिला.

नाताळनंतर निकाल येणार

बिरोबाच्या वनात दसरा मेळाव्यात पार पडतोय. राजे महाराज्यांच्या काळात ढोल वाजवला जात होता. त्याचा निनाद वारंवार झाला पाहिजे. जेणेकरून प्रस्थापितांना धडकी भरली पाहिजे. आज अनेक प्रश्न मनात आहेत. ते सोडवण्यासाठी आपण झगडतोय. धनगरांची जागर यात्रा केली. त्यावेळी लबाड लंडग्यांच्या पिल्लावळीने विष पेरायला सुरुवात केली. आपण दोन लढाई लढत आहोत. महाराष्ट्रातल्या धनगरांची लढाई आपण न्यायालयात लढतोय. नाताळची सुट्टी झाल्यावर धनगर आरक्षणाचा निकाल येईल असं कोर्ट म्हणतंय, असं त्यांनी सांगितलं. (political news)

लबाड लांडगा कोण माहीत आहे ना?

यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसेच त्यांचा उल्लेख लबाड लांडगा असा केला. 70 वर्षात धनगर समाजावर अन्याय झाला, तितका अन्याय कुठल्याच समाजावर झाला नाही. सरकारकडे अनेक वेळ धनगर समाजाची शपथपत्र दिलीत. 1 लाख टक्का आरक्षण मिळेल. तरीही धनगर समाजाने रस्त्यावरच्या लढाईला तयार राहिले पाहिजे. आपल्यात फूट पडावी असे अनेकजण प्रयत्न करत आहेत. फूट पाडण्यासाठीच लबाड लांडगा आरक्षणाला विरोध करतोय. लबाड लांडगा कोण आहे माहीत आहे ना? मराठा आरक्षणला देखील याच लबाड लांडगाने विरोध केला, अशी टीका त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता केली.

बहुजनांची चळवळ दाबण्याचा प्रयत्न

या लबाड लांडग्याने पहिल्यांदा मराठा समाजाला विरोध केला. तीन महिन्यापूर्वी त्यांचा पुतण्या पार्टीतtन फुटला. पुतण्या पार्टीतून फुटला त्यात दुसऱ्यांचा काय दोष आहे? हे सगळेजण छगन भुजबळांच्या विरोधामध्ये शिव्या द्यायला लागले. भुजबळांनी समता परिषदेच्या माध्यमातून बहुजनांना एकत्र करण्याची चळवळ उभी केली होती. बहुजन एकत्र आले तर काय होऊ शकतं हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ही चळवळ दाबण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला.

मुंडेंना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे तुकडे केले. त्याच्यानंतर संघर्ष होता गोपीनाथ मुंडे यांचा. मुंडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले असते. पण गोपीनाथरा मुंडेंना मुख्यमंत्रीपदापासून वंचित ठेवले, असा दावाही त्यांनी केला.

विधानभवनाला घेराव

60 दिवसांची मुदत दिली. पण सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची पावले उचलली नाहीत. 29 दिवसांनंतर धनगर समाज रस्त्यावर उतरेल. आरक्षण अंमलबजावणीची लढाई तीव्र करा. 21 नोव्हेंबर रोजी प्रत्येक तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करा, असं सांगतानाच 11 डिसेंबर रोजी नागपूरला विधान भवन घेरण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *