संजय राऊत यांनी केलं राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारं विधान

(political news) ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांना जावं लागेल. मुख्यमंत्रिपदावरून दूर व्हावं लागेल. असा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी दिला आहे. तर अजित पवार यांचे मुख्यमंत्रिपदाचे दरवाजे बंद झाले आहेत, असं संजय राऊत म्हणालेत. तसंच मी पुन्हा येईन, हा देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हीडिओ भाजपकडून शेअर करण्यात आला आहे. त्यावरही संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदे यांना जावं लागेल. मुख्यमंत्रिपदावरून दूर व्हावं लागेल. असा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी दिला आहे. तर अजित पवार यांचे मुख्यमंत्रिपदाचे दरवाजे बंद झाले आहेत, असं संजय राऊत म्हणालेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं स्थान हे धुळीस मिळालं आहे. याची सर्व माहिती केंद्राला मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल राजीनामा द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने त्या पद्धतीने निर्णय दिला आहे तो मान्य करावा लागेल. अशा प्रकारचा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतो, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

भाजपकडून करण्यात आलेल्या ट्विटवरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या ट्विट करण्या मागचा भाजपचा हेतू सांगितला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईलचं आम्ही सध्या स्वागत करतो. कारण ते कायदेशीर सरकार असेल आम्ही कायदा आणि घटना मानणारी लोक आहोत. जर ते कायदेशीर आणि घटनात्मक मार्गाने येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असंही संजय राऊत म्हणालेत. (political news)

देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते. त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार नाही. सर्वोच्च न्यायालयाने तुमच्यावर ताशेरे उडलेले नाहीत. जर महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे आणि ते देवेंद्र फडणवीस असतील तर आम्ही त्याचे स्वागत करू, असंही राऊत म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *