शरीरात Proteins ची कमतरता आहे का? फक्त हे 4 पदार्थ खा

शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी सर्व पोषक तत्वांची आवश्यकता असते. प्रथिने (protein) आपल्या शरीराला सर्व पोषक तत्वांमध्ये मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जाणून घेऊया त्या शाकाहारी पदार्थांबद्दल जे प्रथिनांची कमतरता दूर करण्यासाठी आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात.

ॲवोकॅडो हे एक महागडं फळ आहे. या फळामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन असतं. शाकाहारी लोकांनी हे फळ खावं, जितकं प्रोटीन एका अंड्याने मिळतं तितकंच प्रोटीन या फळामध्ये असतं. हे फळ कोशिंबीर, सँडविच मध्ये सुद्धा टाकून खाल्लं जातं. ॲवोकॅडो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. फक्त प्रोटीन नाही तर यात व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आहे.

मशरूम खाल्ल्यानं शरीराला पुरेसं प्रोटीन मिळतं. तुम्ही जर शाकाहारी असाल आणि तुम्हाला प्लांट बेस्ड प्रोटीन हवं असेल तर तुम्ही मशरूम खाऊ शकता. हे तुम्ही उकळून सुद्धा खाऊ शकता आणि याची भाजी सुद्धा बनवली जाऊ शकते. अनेकांना मशरूमची भाजी खायला खूप आवडते.

ग्रीक दही हे एक प्लांट बेस्ड प्रोटीन (protein) आहे. जी लोकं शाकाहारी आहेत त्यांना प्रोटीन हवं असेल तर त्यांनी ग्रीक दही खावं. या ग्रीक दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. प्रथिनांची कमतरता भरून काढायची असेल तर हे दही खावं.

प्रथिने खाताना शाकाहारी लोकांना आपल्याकडे प्रोटिन्स खायचा ऑप्शन फार कमी असल्याचं वाटतं. तुम्ही जर शाकाहारी असाल तर तुम्ही वेगवेगळ्या डाळी जेवणात खाऊ शकता. तुम्ही मूग डाळ भिजवू शकता, कोशिंबीरमध्ये या डाळी टाकून खाऊ शकता किंवा डाळीचे सूप बनवून पिऊ शकता. शाकाहारी लोकांना सोयाबीन, चणे, डाळी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *