इचलकरंजी पोलीस ठाण्यात पोलिसांची उडाली चांगलीच तारांबळ

गावभाग पोलिस ठाण्यात एका पोलिस (police) कर्मचाऱ्यालाच धक्काबुक्की करत हमरातुमरीचा प्रकार घडला. पोलिस ठाण्यात नागरिकांची अचानक गर्दी झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. जमावातून त्या पोलिस कर्मचाऱ्याची सुटका करुन जमावाला पांगवण्यात आले. दरम्यान, आर्थिक देवघेवीवरून पोलिसाला कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची चर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू होती.

रविवारी (ता.२२) दुपारी गावभाग पोलिस (police) ठाण्यात अचानक नागरिकांचा मोठा जमाव जमला. पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला जमावातील काही लोकांनी बोलावून घेतले. धक्काबुक्की करत त्याच्या अंगावर धावून गेले. पोलिस कर्मचाऱ्याला हमरातुमरी होत असल्याचे लक्षात येताच अन्य पोलिस कर्मचारी धावून आले. पोलिसाला जमावाच्या तावडीतून बाहेर काढत सुटका करण्यात आली. जमावाला पांगवत पोलिस ठाण्याच्या बाहेर काढले. या घटनेनंतर पोलिस ठाण्याबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *