कोल्हापूरला मिळाला बहुमान!

(sports news) वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (Western India Football Association) उपाध्यक्षपदी मालोजीराजे छत्रपती यांची पाचव्यांदा बिनविरोध निवड झाली. ते कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनचे अध्यक्ष असून, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या (Indian Football Federation) कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.

मालोजीराजे उत्कृष्ट फुटबॉलपटू असून कोल्हापूरच्या फुटबॉल विश्‍वाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. शहरातील स्थानिक संघांना त्यांचे मोठे पाठबळ आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय श्रेणीची फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर झाली.

संतोष ट्रॉफीचे सामने कोल्हापुरात आयोजन करण्यातही त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन यंदा पुन्हा ‘विफा’च्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *