एफडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, RBIने जारी केला नवीन नियम

बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या कष्टाचे पैसे बँकांमध्ये जमा (FD) करणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता बँकांमध्ये १ कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवी करणाऱ्या ठेवीदारांना मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढता येतील. आरबीआयने गुरुवारी, देशातील सर्व बँकांना १ कोटी रुपयांपर्यंतच्या सर्व FD वर मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देण्यास सांगितले असून सध्या ही सुविधा (facilities) १५ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. रिझर्व्ह बँकेने नॉन-कॉलेबल ठेवी असलेल्या मुदत ठेवींची मर्यादा १५ लाख रुपयांवरून एक कोटी रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे आता ठेवीदारांना हे शक्य होणार आहे.

बँकांना आरबीआयचा नवीन आदेश

आरबीआयचा हा आदेश एनआरई डिपॉझिट आणि एनआरओ डिपॉझिटवरही लागू होणार असून हा आदेश तात्काळ लागू झाला आहे. आरबीआयने २६ ऑक्टोबर २०२३ रोजी एक अधिसूचना जारी केली की, बँकांना प्री-मॅच्युअर विथड्रावल पर्यायासह १५ लाख किंवा त्यापेक्षा कमी मुदतीच्या ठेवी घेण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच, प्री-मॅच्युअर पर्यायाशिवाय नॉन-कॉलेबल ठेवींवर वेगवेगळ्या व्याजदराने ठेवी स्वीकारण्याचा पर्याय बँकांना देण्यात आला आहे.

त्याचा आढावा घेतल्यानंतर आरबीआयने नॉन-कॉलेबल FD ची मर्यादा १५ लाख रुपयांवरून १ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यावर प्री-मॅच्युअर पैसे काढण्याची सुविधा (facilities) उपलब्ध असेल.

सध्याचा नियम काय

नॉन-कॉलेबल डिपॉझिट अंतर्गत येणार्‍या एफडीचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी प्री-मॅच्युअर काढण्याचा पर्याय उपलबध नसून एकदा अशा एफडीमध्ये पैसे जमा केले की, कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी एफडी मोडली जाऊ शकत नाही. बँका नॉन-कॉलेबल एफडीवर सामान्य एफडीपेक्षा जास्त व्याज देतात. उदाहरणार्थ, बँक ऑफ बडोदा दोन कोटी रुपयांपेक्षा कमी नॉन-कॉलेबल एफडीवर ०.२५% अधिक व्याज देते.

ही सुविधा कधीपासून लागू होणार?

आरबीआयच्या नव्या आदेशानुसार आता ग्राहकानेकडून १ कोटी आणि त्यापेक्षा कमी रकमेसाठी स्वीकारल्या जाणार्‍या सर्व देशांतर्गत FD मध्ये मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा दिली जाईल. तसेच या सूचना सर्व व्यापारी बँका आणि सहकारी बँकांवर तात्काळ लागू झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *