गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसची योजना; मिळेल दुप्पट नफा

देशातील लोकांनी जास्तीत जास्त गुंतवणूक (investment) आणि बचत करावी यासाठी भारत सरकारने Government Of India पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत विविध योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काही अल्प कालावधीच्या बचत योजना आहेत तर काही दीर्घकालीन बचत योजना आहेत.

शासनाने बचतीला आणि गुंतवणूकीला Investment and Savings प्रोत्साहन देण्यासाठी या योजनांच्या व्याजदरामध्ये देखील चांगली वाढ केली आहे, पोस्ट ऑफिसच्या Post Officeअनेक योजनांमध्ये बँकांहून अधिक व्याजदर मिळत असल्याने अनेकजण या योजनांमध्ये गुंतवणूक करू लागले आहेत.

गुंतवणूक करत असताना ती सुरक्षित ठिकाणी करण्यासोबत जास्तीत जास्त परतावा मिळावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठीच पोस्ट ऑफिसच्या काही योजना या योग्य ठरू शकता.

गुंतवणुकदारांना जास्तीत जास्त नफा देण्यासाठी भारत सरकारने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून किसान विकास योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. ही योजना वन टाइम इनव्हेसमेंट स्किम आहे. म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटप्रमाणे या योजनेमध्ये एकदाच गुंतवणूक करायची आहे.

किसान विकास य़ोजना

इंडिया पोस्टने १९८८ मध्ये किसान विकास पत्र योजना सुरु केली होती. मात्र २०११ सालामध्ये ही योजना बंद करण्यात आली होती. तर २०१४ सालामध्ये पुन्हा एकदा ही योजना सुरु झाली. जोखीम न घेता चांगला परतावा मिळवण्यासाठी ही योजना सर्वोत्तम आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते. या योजनेवर चक्रवाढ व्याजदर मिळत असल्याने अधिक परतावा मिळतो.

हे देखिल वाचा-

किसान विकास योजनेच्या सुविधा

किसान विकास योजनेमध्ये किसान हा शब्द लागल्याने अनेकांना ही योजना केवळ शेतकऱ्यांसाठी असल्याचा समज होवू शकतो. मात्र, ही योजना केवळ शेतकऱ्यांसाठी नसून देशातील कोणताही नागरिक या स्किममध्ये गुंतवणूक करू शकतो.

१८ वर्षांवरिल कोणतीही भारतीय व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकते.

तसंच १८ वर्षांखालील मुलांच्या नावे पालक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेमध्ये सिंगल किंवा जॉइंट अकाउंटचीही सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या नावे गुंतवणूक करणं शक्य आहे.

या योजनेमध्ये कमीत कमी १००० रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रुपयांची गुंतवणूक (investment) तुम्ही करू शकता.

या योजनेचा कालावधी हा ११५ महिने म्हणजेच ९ वर्ष ७ महिने इतका आहे.

गुंतवणुकीवर ७.५ टक्क्यांनी चक्रवाढ व्याज दिलं जातं.

कधीही काढू शकता पैसे

किसान विकास योजनेतील गुंतवणुकीच्या अटी अत्यंत शिथिल ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेत तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली असली तरी गरज असल्यास तुम्ही कधीही पैसे काढून घेऊ शकता. मात्र गुंतवणूक केल्यानंतर एक वर्षाच्या आत पैसे काढून घेतल्यास तुम्हाला व्याज मिळणार नाही. शिवाय तुम्हाला दंड लागू शकतो.

या योजने साठी अडीच वर्षांता लॉकइन पिरियड ठेवण्यात आला असला तरी तुम्ही पैसे मात्र काढू शकता. गुंतवणुकीच्या १ वर्षांनंतर मात्र अडीच वर्षांपूर्वी पैसे काढल्यास तुम्हाला व्याजासह मुळ रक्कम दिली जाते.

तसंच लॉक-इन कालावधीनंतर म्हणजे 2.5 वर्षानंतर आणि मॅच्युरिटी तारखेपूर्वी तुम्ही पैसे काढले, तर तुम्हाला त्या कालावधीचे संपूर्ण व्याज या योजनेला लागू असलेल्या व्याज दराने मूळ रकमेसह दिले जाईल.

दुप्पट मोबदला

किसान विकास पत्र योजनेत एकदा पैसे गुंतवल्यानंतर जर तुम्ही ते संपूर्ण कालावधीनंतर म्हणजेच ९ वर्ष ७ महिन्यांने काढले तर तुम्हाला ते दुप्पटीने मिळतील. शिवाय मॅच्युरिटीनंतरही तुम्ही पैसे काढून न घेतल्यास तुम्हाला व्याज मिळत राहतं. त्यामुळे चांगल्या गुंतवणुकीसाठी पोस्टाची ही योजना एक चांगला पर्याय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *