दिवाळीच्या रात्री चुकूनही या गोष्टी डोक्याजवळ ठेवू नका, कारण…

लक्ष्मीची दिवाळीत (festival) विशेष पूजा केली जाते. लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. संपत्तीची देवी देखील लक्ष्मीला मानले जाते. लक्ष्मीजींना नियम आणि शिस्त जास्त आवडते. त्यामुळे दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनाशी संबंधित गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

माहितीच्या अभावामुळे कधीकधी अशा काही गोष्टी घडतात, ज्याचा वाईट परिणाम होतो. चला तर जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला हवी.

झोपण्याआधी तुमची पर्स चुकूनही उशाखाली ठेवू नका. असे कोणी करत असल्यास तो स्वार्थी असल्याचे दिसते. तसेच त्याचे खर्च कमी होण्याऐवजी आणखी वाढतात. तसेच कुटुंबात आर्थिक तंगीचाही धोका वाढतो.

अनेक लोक रात्री झोपताना पाण्याची बॉटल उशाशी घेऊन झोपतात. वास्तु शास्त्रानुसार ही सवय चुकीची आहे. पाण्याचा संबंध चंद्राशी असतो. त्यामुळे व्यक्तीवर चंद्राचा वाईट प्रभाव पडतो. ज्यामुळे मानसिक तणाव व बऱ्याच समस्या निर्माण होतात.

काही लोक उशाखाली औषधं ठेवून झोपतात. जेणेकरून त्यांना झोपतेवेळी औषधे घेण्याची आठवण असावी. वास्तु शास्त्रानुसार तुम्ही औषधे जवळ ठेवल्यास ते तुम्हाला औषधं जास्त प्रिय असल्याचं दर्शवतात. अशा वेळी तुम्ही आयुष्यभर औषधांनी घेरले जाऊ शकता. तुमचं धन या गोष्टींमध्ये लागल्याने लक्ष्मी माताही तुमच्यावर नाराज होऊ शकते. (festival)

प्रयत्न करा की झोपताना उशाखाली पुस्तकं, पेपर किंवा मॅगजीन ठेवून झोपू नका. वास्तु शास्त्रानुसार असे केल्यास झोपताना तणाव येतो. अनेक लोक लॅपटॉप, फोन आणि स्मार्ट वॉच जवळ घेऊन झोपतात. तुम्हीही असे करत असल्यास तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *