‘या’ रोजी होणार ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ आयोजन
आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ॠतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत आयोजित ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’च्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या जॉब (job) फेअरमध्ये 248 नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, 12 हजार 500 नोकरी इच्छुकांनी नोंदणी केली आहे. साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॅम्पस येथे दि. 5 व 6 नोव्हेंबर रोजी ही जॉब फेअर होत आहे.
आ. ॠतुराज संजय पाटील यांनी तरुणांना रोजगाराच्या उत्तम संधी मिळवून देण्यासाठी ‘ज्ञान आस्था फाऊंडेशन’, ‘द डेटा टेक लॅब’ व ‘नॅस्कॉम’ यांच्या सहकार्याने ‘कोल्हापूर दक्षिण जॉब (job) फेअर’ आयोजन केले आहे. या ‘जॉब फेअर’साठी राज्यासह इतर राज्यातील नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह एकूण 248 कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या आहेत. विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी साळोखेनगर कॅम्पस येथे मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पाडणार आहेत.