राज्यात नवा वाद होणार? मंत्री छगन भुजबळ यांची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल

(political news) मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर रान उठवलं आहे. ओबीसींमध्ये मराठ्यांचा समावेश करावा आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलं होतं. त्यामुळे ओबीसी समाजात एकच खळबळ उडाली होती. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीत घेण्यात विरोध केला होता. मराठा समाज आरक्षणात आला तर आरक्षणाचा टक्का कमी होईल अशी भीती ओबीसी नेत्यांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे ओबीसींनीही उपोषणं सुरू केली होती. याच काळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं एका कार्यकर्त्यासोबत संभाषण झालं. या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात भुजबळ कार्यकर्त्यांना करो या मरोचा सल्ला देताना दिसत आहे.

काय आहे क्लिपमध्ये?

छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना नमस्कार केल्यानंतर थेट विषयाला हात घातल्याचं या ऑडिओ क्लिपमधून दिसत आहे. काय नाही ती सर्व मंडळी आलेली आहेत. आपण आवाज उठवायला पाहिजे. मी तर म्हणतो आवाज उठवा. एक तर मी कुठपर्यंत लढणार? गावागावात ज्या पद्धतीने त्यांचे बुलडोजर चाललेले आहेत, त्यात आता ओबीसी काही वाचणार नाहीत. आपण आता करेंगे या मरेंगे हेच करायला पाहिजे. आवाज द्यायला पाहिजे. असंही मरतंय आणि तसंही मरतंय. त्यांचं सगळं झाले आहे आहे. मी आता उभा रहातो, असं छगन भुजबळ म्हणताना दिसत आहेत.

त्यावर हा कार्यकर्ता म्हणतो, साहेब, त्यांनी फॅमिली घेतली म्हणजे सर्व आलेच आरक्षणात. साहेब तुम्ही निर्णय घ्या आता, कार्यकर्त्यांचं बोलणं झाल्यावर भुजबळ म्हणतात, सगळं झालं सगळं झालं. मी उभा राहतो आता. (political news)

भुजबळ उद्या बीडमध्ये

दरम्यान, मराठा आरक्षणाचं लोण एकदा शांत झाल्यानंतर राज्याचे छगन भुजबळ हे उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे बीडचे जिल्ह्याचे मुख्य पदाधिकारी सुभाष राऊत यांचं सनराईज हे पंचतारांकित हॉटेल मराठा आंदोलकांकडून पेटवण्यात आल होतं. छगन भुजबळ हे उद्या राऊत यांची भेट घेणार आहेत. तसेच त्या हॉटेलची पाहणी करणार आहेत. त्याचसोबत बीड शहरात झालेल्या हिंसाचारात जयदत्त क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांचं घर आंदोलकांनी पेटवून दिलं होत. या दोन्ही नेत्यांच्या घरांनाही भुजबळ भेट देणार आहेत.

छगन भुजबळ यांनी जरंगे पाटील यांना आर्थिक मदत कुठून येते हा सवाल उपस्थित केला होता? त्यामुळे त्यांना मराठा समाजातून अनेक धमक्या येत होत्या आणि उद्या भुजबळ हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्याला जाणार आहे. त्यांच्या या दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध होणार का? हे पाहण महत्वाच आहे.

आईची इच्छा पूर्ण होईल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी दादा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजितदादा यांच्या आईने केलेली इच्छा नक्कीच पूर्ण होईल, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *