वाढदिवस, ४९ वे शतक अन् मिळालं जबरदस्त गिफ्ट

(sports news) विराट कोहलीने त्याच्या वाढदिवशीच २०२३ च्या विश्वचषकातील दुसरे शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने ईडन गार्डन्सवर अवघड विकेटवर १०१ धावांची संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. यासह, त्याच्या वाढदिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो जगातील सातवा फलंदाज ठरला. विराट कोहलीने या शतकासह भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. सामन्यानंतर विराट कोहलीला क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (CAB) वाढदिवसाची भेट दिली.

CAB चे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांनी रविवारी भारतीय फलंदाज विराट कोहलीला वाढदिवसानिमित्त सोन्याचा मुलामा दिलेली बॅट भेट दिली. CAB ने एका निवेदनात म्हटले आहे की कोहलीला बॅट देण्यात आली आहे, ज्यावर ‘हॅप्पी बर्थडे विराट’ लिहिले होते. खाली लिहिले होते, ‘तुम्ही समर्पणाचे प्रतीक आहात आणि वय हा फक्त एक आकडा आहे याचा जिवंत पुरावा आहे.’ विराटने खास त्याच्या पुतळ्यासह डार्क चॉकलेट केकच्या वर ब्लू आयसिंगसह एक मोठा केक देखील कापला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १०१ धावा करून त्याच्या वाढदिवसाचा पुरेपूर फायदा घेतला आणि सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जास्त ४९ शतकांच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. कोहलीने केवळ २७७ डावात आपले ४९ वे शतक पूर्ण केले. महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या ४५१व्या एकदिवसीय डावात ४९वे शतक झळकावले. यानंतर सचिन आणखी एकच सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकनंतर २०२३ च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा खेळाडू आहे. त्याने १०८.६० च्या सरासरीने आणि ८८.२९ च्या स्ट्राईक रेटने ५४३ धावा केल्या आहेत. विश्वचषकात ५०० हून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. (sports news)

खुद्द सचिन तेंडुलकरने विराट कोहलीच्या या शतकासाठी आणि त्याच्या विक्रमाची बरोबरी साधल्याबद्दल त्याचे कौतुक केले आहे. सचिनने ट्विट करत त्याला शुभेच्छा दिल्या आणि ५०व्या शतकासाठी खास मेसेज दिला. तर विराट कोहलीने सुद्धा सचिनच्या या कौतुकासाठी आणि अभिमानासाठी त्याचे आभार मानले. विराट म्हणाला माझ्या हिरोच्या विक्रमाशी बरोबरी करणं हा खूप मोठा सन्मान आहे आणि हा एक भावनिक क्षण आहे. त्याच्याकडुन कौतुक मिळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, असे विराट म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *