ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान
(sports news) रविवारी भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 243 रन्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. कोलकाताच्या इडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दरम्यान हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खुशीत दिसून आला.
टीम इंडियाची सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यावेळी दोघांनी टीमला दमदार सुरुवात करून दिली. यावेळी रोहितने कॅप्टन इनिंग खेळत 24 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली.
ऐतिहासिक विजयावर काय म्हणाला रोहित शर्मा
टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये सलग 8 सामने जिंकले आहेत. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला की, गेल्या तीन सामन्यांमध्ये आम्ही कशी कामगिरी केली हे तुम्ही पाहिलंय. इंग्लंडविरुद्ध आमच्यावर दबाव होता पण आम्ही चांगले रन्स केले आणि त्यानंतर वेगवान गोलंदाजांनी काम केलं. पहिल्याच ओव्हरमध्ये आम्ही एक विकेट गमावली.
रोहित पुढे म्हणाला की, आम्हाला माहिती होतं की, आम्हाला खेळ योग्य दिशेने करावा लागेल आणि खेळपट्टीवर बाकी गोष्टी सोडून द्याव्या लागतील. सामन्यात त्यावेळी आम्हाला परिस्थिती हाताळण्यासाठी आम्हाला कोहलीची गरज होती. (sports news)
गोलंदाजांबाबत काय म्हणाला रोहित?
गोलंदाजांविषयी बोलताना रोहित ( Rohit Sharma ) म्हणाला, शमी ज्या प्रकारे कमबॅक केलंय, त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते. जडेजा आमच्यासाठी खूप चांगला गोलंदाज आहे. वर्षानुवर्षे प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळतोय. डेथ ओव्हर्समध्ये जडेजाने चांगली कामगिरी करत विकेट्स घेतल्या.
रोहित शर्माची उत्तम फलंदाजी
या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) 24 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली. तो दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्याही गोलंदाजाला सेट होऊ देत नव्हता. त्याच्या या खेळीत रोहितने दोन सिक्स आणि चार फोर लगावले. मात्र कागिसो रबाडाने त्याचा काटा काढला. रोहित ( Rohit Sharma ) आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 62 रन्सची पार्टनरशिप केली.