अँजेलो मॅथ्यूजने पुरावा म्हणून दिलेला व्हिडीओ चुकीचा!

(sports news) वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील श्रीलंकेची सुमार कामगिरी पाहता मोठी खळबळ उडाली आहे. क्रीडामंत्र्यांनी आयसीसीला पाठवलेल्या पत्रावर आयसीसीने कारवाई करत श्रीलंकन बोर्ड बरखास्त केलं आहे. आता टाईम आऊट प्रकरणातही मॅथ्यूजने दाखवलेला तो व्हिडीओ चुकीचा असल्याचं म्हंटलं आहे.

मॅथ्यूजला 30 यार्डच्या वर्तुळात पोहोचण्यासाठी 90 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला. त्याच्या ही बाब लक्षात येताच शेवटी धाव घेत केला. तेव्हापासून हेल्मेट स्ट्रिप तुटल्याचं दिसून आलं. तेव्हा एक मिनिटं आणि 54 सेकंद झाली होती.

मॅथ्यूजने या काळात बॉलचा सामना केला नाही. हेल्मेट स्ट्रिप तुटल्यानंतर पंचांना याबाबत कळवलं देखील नाही. या उलट त्याने थेट ड्रेसिंग रुममधून हेल्मेट मागवलं. हेल्मेटसोबत नेमकं काय घडलं आहे त्याने वेळीच पंचांना सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती. कदाचित त्याला हेल्मेट बदलण्याची परवानगी दिली गेली असती.

अपील केल्यानंतर मॅथ्यूजने दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ घालवला होता. त्यामुळे पंचांनी टाईम आऊट दिलेला निर्णय योग्य आहे असं एमसीसीने म्हंटलं आहे. (sports news)

श्रीलंकेचं वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी अपात्र ठरला आहे. त्यामुळे श्रीलंकेला या स्पर्धेत जबर फटका बसल्याचं दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *