WhatsApp ने यूजर्ससाठी लाँच केलं खास फीचर!
व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर (feature) लाँच केलं आहे. मोठ्या ग्रुप्समध्ये व्हॉईस कॉल करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. ‘सायलेंट ग्रुप व्हॉईस कॉल’ असं या फीचरचं नाव आहे. यामुळे ग्रुपमधील सदस्यांना डिस्टर्ब न करता एकत्रित व्हॉईस कॉल करणं शक्य होणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 33 पेक्षा अधिक सदस्य असणाऱ्या ग्रुप्समध्ये हे फीचर मिळणार आहे. त्यामुळेच तुम्हाला कदाचित काही ग्रुप्समध्येच या फीचरचा आयकॉन दिसत असावा.
कसं काम करतं फीचर?
ग्रुपच्या वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या नव्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर सर्व मेंबर्सना कॉल जाणार आहे. मात्र साध्या कॉलप्रमाणे याची रिंग त्यांना जाणार नाही. केवळ त्यांच्या स्क्रीनवर एक पॉप-अप दिसेल. ज्यावर क्लिक करुन ते कॉल जॉईन किंवा कट करू शकतील. यामुळे ज्यांना कॉलमध्ये सहभागी व्हायचं नाही त्यांना डिस्टर्ब देखील होणार नाही.
एका अॅपमध्ये दोन अकाउंट
व्हॉट्सअॅपने आणखी एक खास फीचर (feature) उपलब्ध करून दिलं आहे. एकाच अॅपमध्ये दोन वेगवेगळे अकाउंट वापरण्यासाठी कंपनीने मल्टी अकाउंट फीचर लाँच केलं आहे. प्रोफाईल सेक्शनमध्ये गेल्यावर क्यूआर-कोड शेजारी तुम्हाला डाऊन अॅरो असणारा एक सिम्बॉल दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरं अकाउंट अॅड करण्याचा पर्याय दिसेल.