‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला भाजपा मुंबईतून लोकसभेच तिकीट देणार?
(entertenment news) बॉलिवूडमध्ये नाव, पैसा प्रसिद्धी कमावल्यानंतर अनेक कलाकार राजकारणाकडे वळतात. हेमा मालिनी, राज बब्बर, जया बच्चन, धर्मेंद्र, सनी देओल, उर्मिला मातोंडकर कलाकाराची ही यादी वाढतच जाणारी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष या कलाकारांना तिकीट देतात. त्यांच्या उमेदवारीची मीडियामध्ये बरीच चर्चा होते. लोकप्रियतेमुळे अनेकदा कलाकार निवडणूक जिंकून संसदेतही पोहोचतात. काही कालाकार जनतेने दिलेल्या संधीचा योग्य फायदा करुन घेतात. बॉलिवूडनंतर आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये राजकारणात जम बसवतात. आपल्यासमोर दिवंगत अभिनेते सुनील दत्त आणि गोविंद ही दोन उदहारण आहेत. सुनील दत्त अखेरपर्यंत राजकारणात टिकून राहिले. त्यांनी त्यांच एक वेगळ वलय निर्माण केलं. तेच दुसऱ्याबाजूला गोविंदाच उदहारण आहे. लोकप्रियतेच्या लाटेवर उत्तर मुंबईतून निवडणूक जिंकून लोकसभेत पोहोचला. पण त्यानंतर तो जनतेमध्ये फार दिसला नाही. परिणामी दुसऱ्यांदा त्याला तिकीट मिळालं नाही. तो आपणहूनच राजकारणातून बाहेर गेला.
अनेकदा एखाद्या मतदारसंघात राजकीय पक्षाची तितकी ताकद नसते. त्यावेळी कलाकाराची प्रतिमा, त्याच्या वलयाचा वापर करुन घेण्याचा राजकीय पक्षाचा प्रयत्न असतो. कारण निवडणूक जिंकल्यास विधानसभेत किंवा लोकसभेत एक जागा वाढते. संख्याबळ वाढल्यामुळे स्थिती अधिक भक्कम होते. शिवाय ताकत नसलेल्या मतदारसंघात पक्ष विस्तार करता येतो. पश्चिम बंगालमध्ये बहुतांश कलाकार आता राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यांनी तिथे स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली आहे. दक्षिणेत काही कलाकारांना राजकारणात जम बसवण्यासाठी त्याच्या चित्रपटातील इमेजचा भरपूर फायदा झाला. क्रिकेट आणि बॉलिवूड तसच राजकारण आणि मनोरंजन क्षेत्राच नात आहे. (entertenment news)
कोण आहे ही अभिनेत्री?
आता मुंबईतून एक प्रसिद्ध अभिनेत्री निवडणूक लढवू शकते. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने राजकारणात सक्रीय होणार असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून माधुरीला तिकीट दिले जाणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबई भाजपकडून मात्र या चर्चेला दुजोरा दिला गेलेला नाही. लोकसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपतर्फे माधुरीला तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा आहे. पश्चिम उपनगरातील एका जागेचा विचार केला जाऊ शकतो.