कोल्हापूर जिल्ह्याची वाढली चिंता
जिल्ह्यात डेंग्यूचे (Dengue) वाढते प्रमाण चिंताजनक असून याचा शरीरातील पांढर्या पेशींवर थेट हल्ला होतो. पांढर्या पेशी कमी झाल्याने अशक्तपणासह आरोग्यावर वेगवेगळे परिणाम जाणवत आहेत. झपाट्याने पांढर्या पेशींचे प्रमाण घटत जाऊन जीविताला धोका निर्माण होतो. त्यामुळे प्लाझ्मा, प्लेटलेटस्साठी रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ सुरू असून सामाजिक संस्थांकडून आधार मिळत आहे.
रक्तदानाबद्दल गेल्या काही वर्षांत जनजागृती होऊन रक्तदाते वाढले आहेत. मात्र, सध्या प्लेटलेटस्ची आवश्यकता भासत असून असे दाते वाढण्याची गरज आहे. रक्तदान केलेल्या रक्तातून प्लेटलेटस् व इतर घटक वेगळे केले जातात. पण रक्तदात्याच्या शरीरातील प्लेटलेटस् घेऊन रक्त परत पाठविण्याची एसडीपी प्रक्रिया आता महत्त्वाची ठरत आहे. (Dengue)
एसडीपी बॅगेची किंमत 11 हजार
रक्तातून बाजूला केलेल्या प्युअर प्लेटलेटस्च्या पिशवीची किंमत सुमारे 11 हजारांच्या घरात आहे. रक्तदात्याच्या शरीरातील रक्तातून प्लेटलेटस् वेगळे करण्याच्या या प्रक्रिकेसाठी अंदाजे 55 मिनिटांचा कालावधी व 8 हजार रुपये किमतीचे किट वापरावे लागते. यामुळे ही अत्यंत खर्चिक प्रक्रिया आहे.
14 जणांकडून प्लेटलेटस् दान
सिंगल डोनर प्लेटलेटस् देणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके दाते आहेत. यासाठी 55 मिनिटांचा कालावधी लागतो. अनेकांना या प्रक्रियेची माहिती नाही. रक्तदात्यांनी आता प्लेटलेटस् देण्याकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन ब्लड 24 द 7 ग्रुपचे संस्थापक धनंजय नामजोशी यांनी केले. या संस्थेने सात दिवसांत 14 प्लेटलेटस्दाते देऊन अनेक रुग्णांना आधार दिला आहे.