टी-20 साठी टीममध्ये होणार मोठे बदल; ‘या’ खेळाडूंचा प्लेईंग 11 मधून पत्ता कट?
(sports news) हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या टी-20 च्या कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सिरीजमध्ये 3 सामने झाले असून यापैकी 2 सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवणं शक्य झालं आहे. सिरीजमधील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 सिरीजमधील चौथा सामना संध्याकाळी 7 वाजता रायपूरमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने चौथा टी-20 सामना जिंकल्यास पाच सामन्यांची सिरीज भारताच्या नावे होणार आहे. यावेळी टीम इंडियामध्ये कसे बदल होणार आहे, हे पाहूयात.
कशी असेल ओपनिंग जोडी?
तीन सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी ओपनिंग करत होती. दोन्ही फलंदाज पॉवर-प्लेमध्ये उत्तम खेळी केली. तिसऱ्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाडने शानदार टी-20 शतक झळकावलं. त्यामुळे चौथ्या सामन्यात देखील या जोडी बदलण्याची शक्यता कमी आहे.
मिडल ऑर्डरमध्ये कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी?
चौथ्या टी-20 सामन्यात फलंदाज इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. यानंतर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर उतरू शकतो. तर सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. यावेळी रिंकू सिंहला टीममध्ये संधी मिळणार आहे. श्रेयस अय्यरच्या येण्याने तिलक वर्माला टीमबाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. याशिवाय ऑलराऊंडर म्हणून वॉशिंगटन सुंदरला संधी देण्यात येईल. तर अक्षर पटेलला प्लेईंग 11 मधून बाहेर बसावं लागू शकतं. (sports news)
गोलंदाजी डिपार्टमेंट कसं असणार आहे?
स्पिनर म्हणून रवी बिश्नोईचा प्लेईंग 11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि दीपक चहर यांना संधी देणार आहे. अशावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव प्लेइंग इलेव्हनमधून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
कशी असणार भारताची संभाव्य Playing XI
ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, रवी बिश्नोई, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा.