हिवाळ्यात बोटांना सूज, ‘हे’ उपाय करुन वेदनापासून मुक्ती मिळवा

हिवाळा हा आरोग्यदायी ऋतू मानला जातो. मात्र, थंडीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांना विविध समस्या भेडसावू शकतात. काही लोकांच्या हाता-पायाची बोटे हिवाळ्यात सुजतात. यावेळी, बोटांना सूजच नाही तर जळजळ आणि खाज सुटण्याबरोबरच वेदनाही होतात. अशावेळी काही घरगुती उपाय करून तुम्ही या सूज आणि वेदनापासून (pain) मुक्ती मिळवू शकता, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अर्थात प्रत्येकाची शरीरप्रकृती वेगवेगळी असल्याने याबाबत डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपाय करणे हितावह ठरत असते.

बोटांची सूज दूर करण्यासाठी टिप्सऑलिव्हचे तेलाला कोमट गरम करून त्यात हळस टाकून एकत्र करा. ती सुकल्यावर बोटांवर लावा. काही वेळ तसेच राहू द्या. मग कोमट पाण्याने धुऊन टाका, त्यामुळे झटपट आराम मिळेल.

लसूण सोलून मोहरीच्या तेलात थोडा वेळ शिजवून घ्या. हे तेल थोडे कोमट केल्यानंतर बोटांना लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. काही वेळाने बोटांना हलक्या हाताने मसाज करा. असे दिवसातून दोन ते तीन वेळा करा. लवकरच सूज आणि वेदना (pain) कमी होतील.

लिंबाचा रस देखील यासाठी प्रभावी ठरू शकतो. गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्यात काही वेळ बोटे बुडवून ठेवा. पाणी थंड झाल्यावर बोटे काढून धुवा. यामुळे तुम्हाला लवकरच वेदना आणि सूज यापासून आराम मिळेल

काय करू नये

1. हातापायांची बोटे सुजलेली असल्यास, हीटरसमोर कधीही शेकू नये. यामुळे तुमच्या वेदना वाढू शकतात. त्यामुळे हे करू नका.
2. हिवाळ्यात जमिनीवर अनवाणी पायाने चालू नका. असे केल्याने थंडीमुळे आणखी बोटे सुजतात.
3. थंडीच्या ऋतूमध्ये शक्य असल्यास, लोकरीचे मोजे घाला आणि चप्पल हलकी असावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *