महामार्गावर धरण? कोल्हापूरकरांचा तीव्र विरोध
पुणे-बंगळूर महामार्गाची (highway) उंची भराव टाकून वाढवण्यात येणार आहे. यामुळे दरवर्षी कोल्हापुरातील निर्माण होणारी पूरस्थिती आणखी गंभीर होण्याचा धोका आहे. भराव टाकून उंची वाढवण्याच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निर्णयाला कोल्हापूरकरांनी तीव— विरोध केला आहे. याबाबत संताप व्यक्त होत असून भराव टाकून महामार्गाची उंची वाढवू नका, प्रसंगी जनआंदोलन उभारू, असा इशारा देण्यात आला आहे.
महापुरात महामार्गाचा शहराशी संपर्क तुटू नये, याकरिता शिरोली ते पंचगंगा पूल या परिसरात भराव टाकून उंची वाढवण्यात येणार आहे. या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी बॉक्सेस बांधण्यात येणार असले तरी याकरिता टाकलेला भराव धरणासारखेच काम करणार आहे. यामुळे ‘महामार्गावर धरण आणि आमच्या दारात मरण’ असा हा प्रकार आहे. मात्र आम्ही तो होऊ देणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
‘महामार्गावर धरण? कोल्हापूरकरांचे मरण’ प्रसिद्ध होताच नागरिकांतून तीव— प्रतिक्रीया उमटू लागल्या. मुळातच निम्मे शहर पाण्याखाली जाते. त्याला महामार्गाची (highway) सध्याची परिस्थिती कारणीभूत आहे. आता महामार्गाची उंची आणखी वाढली तर ती परिस्थिती आणखी गंभीर व्हावी, नागरिकांचे मोठे नुकसान व्हावे, अशी प्रशासनाची इच्छा आहे का, असा खडा सवालही उपस्थित केला जात आहे.
महापुरातही महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी याकरिता महामार्गावरील पुराच्या सर्वोत्तम पातळीच्या चार फूट उंच महामार्ग होणार आहे. यामुळे शिरोली ते पंचगंगा पूल या ठिकाणी शहराच्या बाजूला धरणासारखीच परिस्थिती निर्माण होणार आहे. हे पाणी वाहून जाण्यासाठी बॉक्सेस बांधण्यात येणार आहेत. मात्र, त्याऐवजी उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे. कराड येथे दीड-दोन किलोमीटर लांबीचा पूल उभारला जात आहे. मग कोल्हापुरात एक कि.मी.चा पूल का होत नाही, असा सवालही उपस्थित होत आहे.