राजाराम साखर कारखान्याचा ऊस दर जाहीर
श्री छत्रपती राजाराम साखर कारखाना सन 2023-24 या गळीत हंगामात गाळपास येणार्या उसास (sugercane) 3,100 रु. प्रति मे. टन ऊस दर देणार आहे.
कारखान्याची यावर्षीच्या हंगामाचा 12 टक्के साखर उतारा गृहीत धरून एफ. आर. पी. 3687.25 रु. प्रति मे. टन इतकी येते. त्यामधून 2023-24 चा अंदाजित सरासरी तोडणी वाहतूक खर्च रु.687.25 वजा जाता निव्वळ एफ. आर. पी. प्रमाणे 3,000 रु. प्रति मे. टन ऊस दर येतो. तथापि, कोणताही उपपदार्थ प्रकल्प नसताना शेतकर्यांच्या उसाला जादा ऊस दर देण्यासाठी एफ. आर. पी. पेक्षा 100 रु. जादा उचल देऊन प्रति मे. टन 3,100 रु. ऊस दर देण्याचा निर्णय कारखान्याच्या संचालक मंडळाने जाहीर केला आहे.
कारखान्याचे दि. 4 डिसेंबर अखेर 65,780 मे. टन ऊस (sugercane) गळीत झाला असून, 65,480 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. चालू वर्षी कारखान्याने 4,50,000 मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून गळीत हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन माजी आ. अमल महाडिक यांनी केले आहे.