“काम ताबडतोब थांबवावे; अन्यथा तीव्र आंदोलन करू”

पुणे-बंगळूर महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. भराव टाकून पूल बांधण्यास आमचा विरोध असून, भराव टाकण्याचे काम ताबडतोब थांबवावे; अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा भराव टाकला, तर तो उखडून टाकू, असा इशारा (warning) शेतकरी संघटनेचे माणिक शिंदे यांनी दिला. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांना निवेदन दिले.

पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतील सर्व मंत्री, खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत शिरोलीपासून भराव न टाकता पिलर उभा करून पूल करावा, अशी सूचना केली होती. त्याकडे दुर्लक्ष करत भराव टाकण्याचे काम सुरू आहे. त्याला कोल्हापुरातून तीव्र विरोध सुरू झाला. शेतकरी संघटनेच्या वतीने भराव टाकण्यास विरोध करून भराव टाकल्यास तो उखडून टाकण्याचा इशारा (warning) दिला आहे.

महामार्गावर शिरोली ते पंचगंगा नदी हा मार्ग भराव टाकून उंच केला जाणार आहे. यामुळे महामार्गाची उंची वाढणार असल्यामुळे शहराला पुराचा धोका आणखी वाढणार आहे. 2003 पूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही महापूर आला नव्हता. परंतु, पुणे- बंगळूर महामार्गाचे चौपदरीकरण करताना भराव टाकण्यात आल्याने रस्त्याची उंची दहा फुटाने वाढली. त्यामुळे शहराला महापुराचा फटका बसला. 2019 व 2021 मध्ये कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसला. सहापदरीकरण करताना भराव टाकून रस्त्याची उंची वाढविल्यास महापुरात शहर पाण्याखाली जाणार आहे. परदेशाप्रमाणे भारतातही रस्ते विकासाचे उच्च तंत्रज्ञान विकसित असताना त्याचा वापर सरकार का करत नाही? पूरप्रवण क्षेत्रात पिलरवर पूल करणे आवश्यक असताना सरकार जाणूनबुजून भराव टाकून कोल्हापूरला सापत्नपणाची वागणूक देत आहे. हे आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे सांगली फाटा ते उचगाव दरम्यानच्या महामार्गावर भराव न टाकता पिलरवर पूल करावेत; अन्यथा संघटनेच्या वतीने हा भराव उद्ध्वस्त केला जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *