इंडिगो विमान कंपनी आजपासून बंद करणार ‘ही’ कोल्हापूर विमानसेवा
कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा (Airlines) शुक्रवारपासून (दि. 15) इंडिगो विमान कंपनी बंद करणार आहे. या विमानसेवेचा गुरुवार शेवटचा दिवस ठरला. त्यातून 68 प्रवासी कोल्हापूरला आले, तर 54 प्रवासी तिरुपतीला गेले.
अंबाबाई व तिरुपती या दोन धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, या द़ृष्टीने विमानसेवा (Airlines) सुरू झाली. केंद्र शासनाच्या उडान योजनेतून तिकीट दर कमी असल्याने याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. परंतु, कोल्हापूर विमानतळ उडान योजनेतून रद्द झाल्याने तिकीट दर वाढले. याचा परिणाम प्रवाशांवर होत गेला व कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा बंद झाली. कंपनीकडून पर्यायी व्यवस्था म्हणून कोल्हापूर-हैदराबाद-तिरुपती व तिरुपती-हैदराबाद-कोल्हापूर अशी सुविधा निर्माण केल्याचे कळवले आहे; परंतु याचा दर आता दोन ते अडीच हजारांनी वाढणार आहे.