निवडणूकीत मुश्रीफ गटाची बाजी; १९ जागांवर एकतर्फी विजय

गवसे येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकित (election) शेवटपर्यंत झालेल्या चूरशीच्या लढतीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी प्रणित श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने सत्ताधारी भाजप, काँग्रेस, दोन्ही शिवसेना, स्वाभिमानी प्रणित देव चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीचा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला आहे. या निकालात रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने १९ जागांवर विजयाचा गुलाल उडवून बाजी मारली तर सत्ताधारी आघाडीला केवळ २ जागावर समाधान मानावे लागले. अर्ज माघारी दिवशी श्री चाळोबा देव विकास आघाडीचे भटक्या विमूक्त गटातील संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

राष्ट्रवादी आघाडीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ,आमदार राजेश पाटील,माजी आमदार के.पी पाटील यांनी प्रचारसभा घेतल्या तर श्री चाळोबा देव आघाडीसाठी आमदार सतेज पाटील यांनी प्रचारसभा व पत्रकार बैठका घेतल्या.दोन्ही आघाडीच्या प्रमूखांनी एकमेकावर जोरदार टिका केली होती.कांहीनी खालच्या पातळीवर जाऊन टिका केल्याने निवडणूकित तणाव निर्माण झाला होता.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ८ वाजता निवडणूक (election) निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरवात झाली.सकाळी १० वाजेपर्यंत दोन्ही आघाडीमध्ये चूरस दिसत होती. पाचही गटामध्ये क्राँस वोटींगचे प्रमाण वाढताना दिसत होते.त्यामुळे उपस्थित उमेद्वार त्यांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये घालमेल दिसत होती.सकाळी साडे दहापर्यंत उत्तूर गटात ६५० ची आघाडी होती तर अन्य चार गटात अत्यंत चूरशीची लढत दिसून येत होती.भादवण,गजरगाव येथे दोन्हीही आघाड्यांना समान मते दिसून येत होती.

दुपारपर्यंत उत्तूरची ६८० ची असणारी आघाडी १००वर आल्याने मतमोजणीत पुन्हा चुरस निर्माण झाली.दरम्यान ‘ब’वर्गात अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी आघाडीचे नामदेव नार्वेकर ३६मतांनी पुढे राहीले तर पुढच्या मतपेटीतील मतमोजणीत चाळोबा देव आघाडीचे अशक तर्डेकर ४ मतांनी पुढे राहीले.त्यामुळे नार्वेकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *