धक्कादायक! विवाहितेनं दोन वर्षांच्या मुलासह संपवलं जीवन

(crime news) भेंडवडे (ता. भुदरगड) येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. काजल अवधूत सलते (वय ३२) व मुलगा प्रियांशू (२) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी भुदरगड पोलिसांनी (Bhudargad Police) आज पती अवधूत (३५), सासरा बळवंत सलते, सासू यशोदा सलते व नणंद शामल दत्तात्रय पाटील (नाधवडे) या चौघांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मुगळी येथील काजल हिचा विवाह भेंडवडे येथील अवधूत सलते याच्याबरोबर झाला होता. सध्या त्याचे गावात किराणा मालाचे दुकान आहे. यापूर्वी काही दिवस तो मुंबईत वास्तव्यास होता. यावेळी मुंबईत (Mumbai) खोली घेण्यासाठी अवधूत आणि त्याची आई व बाबा, बहीण यांनी काजलच्या माहेरी दोन लाख रुपयांची मागणी केली होती.

पैशाच्या मागणीची पूर्तता होत नसल्यामुळे पती अवधूत व सासू-सासरे आणि नणंद यांच्याकडून काजलचा सतत शारीरिक व मानसिक छळ होत होता. या छळाला कंटाळून काजलने मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास विहिरीत दोन वर्षांच्या चिमुकल्यासह उडी घेऊन आत्महत्या केली.

काजल हिच्या भावाने काजलचा पती, सासू, सासरे व नणंद यांच्याकडून दोन लाख रुपये पैशाची सतत मागणी केली जात होती. त्याची पूर्तता न केल्यामुळे तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने चिमुकल्यासह आत्महत्या केल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत चौघांना अटक केली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के तपास करीत आहेत. (crime news)

काय घडले?

काजल मुलाला घेऊन सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घरातून निघून गेली होती. ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. मंगळवारी सकाळी घरामागील पांडुरंग धुमाळ यांच्या शेतातील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. यानंतर गारगोटी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *