कोल्हापूर पोलिसांनी ‘या’ आदेशाची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्यास गांभीर्याने दखल

मेकर्स ग्रुप घोटाळाप्रकरणी तपास करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांनी दाखवलेली दिरंगाई अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे निरीक्षण नोंदवून फरार संशयितांना 16 जानेवारीपर्यंत अटक करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी कोल्हापूर जिल्हा पोलिसप्रमुखांना दिले. भास्कर लिमकर याच्या जामीन अर्जावर सुनावणीच्या वेळी न्या. जी. ए. सानप यांनी आदेश (order) तपासात कसूर करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांवरसुद्धा कारवाई करण्याचे आदेश दिले. सर्वसामान्य गुंतवणूकदार न्यायासाठी रडत असल्याचे गंभीर निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे.

जिल्हा पोलिसप्रमुख, कोल्हापूर तसेच तपासी अधिकारी यांना सर्व संशयितांना अटक करून आदेशाची अंमलबजावणी केल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे तसेच याप्रकरणी आदेशाची प्रत कोल्हापूरच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांना पाठवून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले. जर पोलिसांनी या आदेशाची (order) अंमलबजावणी करण्यात कसूर केल्यास गांभीर्याने दखल घेण्यात घेईल, असेही आदेशात नमूद केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *