माधुरी दिक्षित मकर संक्रांत साजरी कराणार चाहत्यांसोबत, मात्र आहे एक अट!

(entertenment news) माधुरी दिक्षित एक अशी अभिनेत्री आहे जिच्या स्माईलवर सगळेच फिदा आहेत. जिच्या अदाकारीने अनेक जण घायाळ होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, पुरूषांपासून स्त्रियांपर्यंत जगभरात तिचे असंख्य चाहते आहेत. अशा या आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची झलक पाहाण्याची, तिला भेटण्याची इच्छा अनेकांना असते. आता हे स्वप्न ‘पंचक’च्या माध्यमातून लवकरच पूर्ण होणार आहे. कारण स्वतः माधुरी दिक्षित ह्यांच म्हणणं आहे , “खूप छान वाटते, जेव्हा चाहते माझ्या अभिनयाचे, नृत्याचे आणि हास्याचे कौतुक करतात. अनेक जण मेसेजेस करतात, अनेक जण भेटण्याची इच्छा व्यक्त करतात.

परंतु या सगळ्यांना भेटणे शक्य होत नाही. त्यामुळेच आमचा ‘पंचक’ चित्रपट नवीन वर्षात ५ जानेवारी प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने आम्ही हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. जेणे करून मी माझ्या मैत्रिणींना भेटू शकेन. यावेळी महाराष्ट्रातील निवडक १०१ मैत्रिणींना मी ठाण्यात भेटून, त्यांच्यासोबत हळदी कुंकू साजरे करणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करावी लागणार आहे. ‘पंचक’ या चित्रपटाचे तिकीट बुक करून चित्रपटगृहात जाऊन आपला आणि तिकिटाचा फोटो काढून ‘पंचक’च्या अधिकृत इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवर शेअर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार आहे, माझ्या आणि ‘पंचक’मघील खोतांच्या घरातील महिलांसोबत हळदी कुंकू समारंभ साजरा करण्याची. तर मग भेटुयात लवकरच.

‘पंचक’ या चित्रपटाची निर्मिती डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित नेने यांनी केली असून राहुल आवटे आणि जयंत जठार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. नुकतीच माधुरी दिक्षित नेने, डॅा. श्रीराम नेने, मुलगा अरीन, रायन, वडील माधव नेने, आई अनू नेने यांनी सहकुटुंब प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पंचक’ या चित्रपटासाठी बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. (entertenment news)

जयंत कठार व राहुल आवटे यांनी दिग्दर्शित पंचक या सिनेमासाठी प्रेक्षकांमध्ये खू उत्सुक आहेत. मराठी चित्रपटांमध्येही सध्या मल्टिस्टारर चित्रपट पाहायला मिळत आहेत. ‘पंचक’ या चित्रपटातूनही ज्येष्ठ तसेच लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते आहे. या चित्रपटातून आदिनाथ कोठारे, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर, ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी सतीश आळेकर, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *