बाप का मेंटल बेटा… हिणवताच सलमान खान भडकला, नेमकं काय घडलं ?
(entertenment news) नेहमीप्रमाण ‘बिग बॉस 17’चा हा सीझनही चांगलाच चर्चेत आहे. दर ठआवड्याला ‘बिग बॉस’च्या घरात काही ना काही राडा पहायला मिळतो. यावेळीही काही वेगळी परिस्थिती नाही, उलट आता तर घरातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. या आठवड्यात शोमध्ये बरंच पोकिंग झालं. त्यामुळे शोमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे. समर्थच्या कानशिलात लगावल्यानंतर अभिषेक कुमार याला शोच्या बाहेर काढण्यात आलं.
खरंतर ईशा मालवीय आणि समर्थ जुरैल या दोघांनी मिळून अभिषेक कुमारला प्रमाणाच्या बाहेर पोक केलं. त्या तिघांचं भांडण इतक वाढलं की रागाच्या भरात अभिषेकने समर्थच्या कानाखाली मारली. त्याच्या या कृत्याचे घरात जोरदार पडसाद उमटले आणि अखेर अभिषेकला घराबाहेर जावं लागलं. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेकच्या बाबतीत कोणता निर्णय घ्यायचा, हे बिग बॉसने घराची कॅप्टन अंकिताला ठरवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर अंकिता लोखंडेनं अभिषेकला घराबाहेर काढलं आहे.
सलमानचा अभिषेकला सपोर्ट
मात्र आता या सर्व गोष्टींमुळे या शोचा होस्ट सलमान खान चांगलाच भडकलेला दिसला. ‘वीकेंड का वार’ मध्ये या मुद्यावरून त्याने घरातल्यांची चांगलीच कानउघडणी केली. पोकिंग करून अभिषेकला जबरदस्ती उकसवल्याप्रकरणी सलमान खानने समर्थला चांगले फटकारले. त्याने ईशा मालवीयलाही सुनावल्याचे या एपिसोडमध्ये पहायला मिळेल.
घरातल्यांवर ओरडत सलमान म्हणाला- अभिषेक चुकीचा आहे. तो 100 % चुकलाय. पण त्याला ती चूक करण्यास भाग पाडणारा (माणूस) चुकीचा नाही का ? असा सवाल सलमानने सर्वांना विचारला. ‘ तोंडात टिश्यू पेपर कोंबणे, बाप का मेंटल बेटा.. असं बोलणं. तुम्ही सगळे हा संपूर्ण प्रकार बघत होतात, पण कोणीच समर्थला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. तू वेडा झाला आहेस का ? हे तू काय करतोयस ? हे सगळं करू नकोस.. असं कोणीही त्याला सांगितलं नाही ‘ अशा शब्दांत सलमानने घरातल्या सदस्यांना फटकारलं. (entertenment news)
ईशाचीही काढली खरडपट्टी
सलमानने त्यानंतर ईशा मालवीयचीही खरडपट्टी काढली. ‘तू जर अभिषेक असतीस (अभिषेकच्या जागी असतीस) तर तू काय केलं असतं ?’ असा सवाल सलमानने ईशाला विचारला. तेव्हा ती म्हणाली ‘मी मारलं असतं सर..’
सलमानने समर्थलाही चांगलंच सुनावलं. ‘ त्याने (अभिषेक) तुझ्यावर हात उचलावा अशीच तुझी इच्छा होती ना ? मग असंच झालं ना ? ‘ असं सलमानने समर्थला विचारलं. तेव्हा समर्थ म्हणाला – ‘हा त्याचा ट्रिगर पॉईंट आहे, हे मला माहीत होतं. तो मानसिकरित्या इतका स्ट्राँग नाही.’ त्यावर सलमान म्हणाला – तुला हाच फिनाले हवा होता, तू त्यात यशस्वी ठरलास. एकूणच या वीकेंड का वारमध्ये सलमानचा भडकलेला अवतार दिसला आहे. घरातल्यांमुळे सलमान बराच रागावला आहे.
काही दिवसांपूर्वीच ईशा मालवीय, समर्थ जुरैल आणि अभिषेक कुमार यांच्यात मोठा वाद झाला होता. त्यावेळी ईशा आणि समर्थने अभिषेकला बरंच पोक केलं. ईशा आणि समर्थ हे दोघं अभिषेकच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवरून त्याची खिल्ली उडवत होते. त्यामुळे संतापलेल्या अभिषेकने रागाच्या भरातच समर्थच्या कानाखाली लगावली. त्यानंतर त्याला घराबाहेर काढण्यात आलं.