‘कुबूल है’ फेम झोया ‘या’ गडगंज श्रीमंत व्यक्तीसोबत अडकणार विवाहबंधनात

(entertenment news) झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक अभिनेत्री, अभिनेते त्याच्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत. अशाच टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री देखील बॉयफ्रेंडसोबत लवकरच लग्न करणार आहे. ‘कुबूल है’ फेम झोया म्हणजे अभिनेत्री सुरभी ज्योती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सुरभी हिच्या होणाऱ्या पतीचं नाव सुमीत सुरी (Sumit Suri) आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुरभी आणि सुमित यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सुरभी हिचा होणारा पती सुमित याच्याबद्दल सांगायचं झालं तर, सुमीत उद्योजक आहे. शिवाय सुमीत अभिनेता आणि निर्माता देखील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुमीत आणि सुरभी एकमेकांना डेट करत आहेत. सुरभी आणि सुमितने आता त्यांच्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

आलिया, नयनतारा नाही तर, ‘ही’ आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री; एका सिनेमासाठी घेते पाण्यासारखा पैसा
मिळालेल्या माहितीनुसार, 6 किंवा 7 मार्चला सुरभी आणि सुमित यांचं लग्न होणार आहे. सध्या दोन्ही कुटुंबात लग्नाची तयारी देखील सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. सुरभी आणि सुमित यांचा विवाह उत्तर भारतीय रितीरिवाजानुसार होणार आहे… असं देखील सांगण्यात येत आहे. दोघांच्या लग्नात फक्त कुटुंब आणि मित्र उपस्थित राहतील.

 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुरभी आणि सुमित यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. पण दोघांनी देखील यावर अधिकृत घोषणा केलेली नाही. सांगायचं झालं सुमित याच्याआधी सुरभी हिचं नाव अभिनेता पर्ल वी पुरी (Pearl V Puri) याच्यासोबत जोडण्यात आलं होतं. सोशल मीडियावर देखील दोघांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली…

सुरभी हिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ‘कबुल हैं’ मालिकेमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. मालिकेतील अभिनेता करण सिंह ग्रोवर याच्यावर सुरभी हिची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. ‘नागीन’ मालिकेमुळे देखील सुरभी प्रसिद्धी झोतात आली.(entertenment news)

सुरभी फक्त तिच्या मालिकांमुळेच नाही तर, सौंदर्य आणि फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *