शिवाजी विद्यापीठाचे पहिले ‘लोकपाल’ नियुक्त

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (सेवानिवृत्त) सुधीर पुरुषोत्तम कुलकर्णी यांची शिवाजी विद्यापीठाच्या प्रथम लोकपालपदी नियुक्ती (appointment) करण्यात आली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), नवी दिल्ली यांच्या 11 एप्रिल 2023 रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष व लोकपाल नियुक्ती करण्याचे आदेश आहेत. त्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाच्या निकालाबाबत अपिलीय अधिकारी व लोकपाल म्हणून निवृत्त न्या. सुधीर कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे.

त्यांच्या नियुक्तीस (appointment) त्यांनी स्वीकृती दर्शविली आहे. न्या. कुलकर्णी यांनी बी.एस्सी. (ऑनर्स) व एल.एल.एम. पदवीनंतर मार्च 1988 मध्ये अहमदनगर येथे विधी सेवा रुजू केली. नांदेड येथून मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशपदावरून ते सप्टेंबर 2018 मध्ये निवृत्त झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *