कोल्हापुरात राजकीय चर्चांना उधाण

मोटारसायकलबरोबर म्हैस व रेडकू पळवण्याच्या शर्यतीच्या निमित्ताने राज्यसभा खासदार (political leader) धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावडा (Kasaba Bawada) येथील कागलवाडी परिसरात केलेली बुलेट सवारी चर्चेचा विषय ठरली.

खासदार (political leader) महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून या स्पर्धा झाल्या. उलपे गल्ली, कागलवाडी परिसरातील महाडिकप्रेमी यांच्या वतीने महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त या शर्यती झाल्या. झेंडा चौक ते जयभवानी गल्ली चौक या मार्गावर झालेल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाडिक यांच्या हस्ते झाला. सायंकाळी महाडिक यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बुलेटवर मागे बसून शर्यत मार्गावर सवारी करून उपस्थितांना दाद दिली. त्यांची ही बुलेट सवारी मात्र चर्चेचा विषय ठरली. ‘राजाराम’ कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप उलपे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे, विजय उलपे, सामाजिक कार्यकर्ते सचिन पोवार आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *