संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीतील उमेदवारीबाबतच्या चर्चेला दिला पूर्णविराम
संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीतील (political party) कोणत्याही घटकपक्षात प्रवेश केल्यास त्यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र, आपला स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची भूमिका व्यक्त करून संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीतील उमेदवारीबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
गुरुवारी दिवसभर संभाजीराजे यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून चर्चा सुरू होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत त्यांनी जर महाविकास आघाडीतील (political party) कोणत्याही घटकपक्षात प्रवेश केल्यास त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीची भूमिका असल्याचे सांगितले जात होते. मात्र, संभाजीराजे यांनी स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही.
राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल, असा विश्वास व्यक्त करून याच ध्येयाने आपली व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार असल्याचे ट्विट केले आहे.