प्रेग्नंसी नव्हे तर अनुष्काला प्रकृतीच्या समस्या? परदेशात उपचार सुरू
(entrtenment news) अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर असल्याची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे विराटसुद्धा क्रिकेट सामन्यांपासून दूर आहे. या दोघांनी अद्याप प्रेग्नंसीविषयी कोणतीच अधिकृत माहिती दिली असून माध्यमांपासूनही ते दूर आहेत. अशातच अनुष्काच्या प्रकृतीविषयी एका पत्रकाराच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. पत्रकार अभिषेक त्रिपाठीने ट्विटरवर एक पोस्ट लिहिली असून त्यात त्याने अनुष्का आणि विराटचा उल्लेख केला आहे.
संबंधित पत्रकाराने लिहिलं, ‘चार गोष्टी- एक : जे डिविलियर्स म्हणाला होता ते बरोबर होतं. दोन : काही समस्या आहेत ज्या कारणामुळे विराटने परदेशातील डॉक्टरांकडे उपचार घेण्याचा आणि कुटुंबीयांसोबत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तीन : त्याने बीसीसीआईची परवानगी घेऊन या वेळेत कुटुंबीयांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. चार : आपल्याला त्याच्या सुखद भविष्यासाठी प्रार्थना करायला हवं.’ ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. विराट आणि अनुष्काच्या खासगी आयुष्याचा सन्मान न केल्याने काहींनी संबंधित पत्रकारावर टीका केली आहे. तर काहींनी अनुष्काच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.
चार बात एक : जो डिविलियर्स ने कहा था वह बात सही थी दो : कुछ दिक्कतें हैं जिसके कारण विराट ने विदेश में डॉक्टर को दिखाने और परिवार के साथ रुकने का निर्णय किया तीसरा : उन्होंने बीसीसीआई से अनुमति लेकर इस समय परिवार के साथ बिताने का निर्णय लिया है चौथा : हमें उनके सुखद भविष्य की…
इंग्लंडविरोधातील पाच मॅचच्या सीरिजमधील शेवटचे तीन टेस्ट मॅच विराट कोहली खेळणार नसल्याचंही स्पष्ट झालं आहे. सीरिजच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमधूनही त्याने ब्रेक घेतला होता. यादरम्यान काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि विराटचा मित्र एबी डिविलियर्सने त्याच्या युट्यूब चॅनलवर मोठा खुलासा केला होता. विराट दुसऱ्यांदा पिता बनणार आहे आणि तो सध्या त्याच्या कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करत आहे, असं म्हणत त्याने विराट आणि अनुष्का शर्माच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मात्र काही दिवसांपूर्वी अचानक एबी डिविलियर्सने त्याच्या या वक्तव्यापासून माघार घेतली. इतकंच नव्हे तर त्याने चाहत्यांची माफीसुद्धा मागितली होती. एबी डिविलियर्सने म्हटलं होतं की त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि त्याने विराटबद्दल जी माहिती दिली, ती चुकीची होती. (entrtenment news)
एबी डिविलियर्सने त्याच्या युट्यूब लाइव्हदरम्यान म्हटलं होतं, “मला इतकंच माहीत आहे की विराट ठीक आहे. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. त्यामुळे पहिल्या दोन टेस्ट मॅचेसमध्ये तो खेळला नाही. तो लवकरच दुसऱ्यांदा पिता बनणार आहे. त्यामुळे कुटुंबीयांसोबत घालवलेली वेळ खूप महत्त्वाची असते.”