“काँग्रेस पुन्हा उभारी घेणार”

(political news) राजकारणात पक्षात बदल होत असतात, लोकं येत असतात, तसे जातातही. एक व्यक्ती पक्षाच्या बाहेर गेली म्हणजे काही पूर्ण पक्ष डिस्टर्ब होत नाही. या परिस्थितीमधून काँग्रेस पुन्हा उभारी घेईल आणि पक्ष मजबुतीन उभा राहील असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेके विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. मी कायम काँग्रेससोबतच आहे. पक्षाने मला खूप काही दिलं. मी काँग्रेससोबत होतो, काँग्रेससोबत आहे आणि काँग्रेससोबतच राहणार असेही वडेट्टीवर यांनी स्पष्ट केलं.पक्षाने मला भरभरू दिलं, मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहूनच विचारधारेसोबत काम करणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

काल दुपारी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी जदिल्.ाने पक्षाला मोठा झटका बसला. चव्हाणांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि काल अशोक चव्हाण असे पक्षातील ज्येष्ठ नेते एकामागोमाग एक पक्षातून बाहेर पडत असल्याने काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची बैठकही झाली. तसेच आता येत्या 16,17 फेब्रुवारीला काँग्रेसचं शिबीर पडणार आहे.

भाजपला दुसऱ्यांचे नेते पळवायची सवय

एकीकडे भाजप अब की बार 400 पार चा नारा देत आहे. पण दुसरीकडे ते इतर पक्षातील नेते पळवत आहेत. यांना यांच्यावरच विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती देशामध्ये दिसत आहे. भाजपला स्वत:च्या कामगिरीवर यश मिळवता येत नाही. प्रभू रामचंद्राच्या नावे राजकारण करून झालं , त्यावरही त्यांना फार काही करता आलं नाही. त्यामुळेच इतर पक्षातील नेते पळवून, नेते फोडून घर सजवण्याचं काम भाजप करत आहे. लोकांना हे मान्य होणार नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. (political news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *