रितेश देशमुखनंतर जुईनेही ‘त्या’ व्हिडिओवर व्यक्त केला राग

(entertenment news) सध्याच्या काळात सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचा साधन म्हणून ओळखल जात. सर्वसामान्य व्यक्तींपासून अनेक सेलिब्रिटी मंडळी देखील या माध्यमातून आपली मत ठामपणे व्यक्त करतात. एखादी गोष्ट आवडली असल्यास त्याचे कौतुक होते तर एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर त्यावर निदर्शने देखील केली जातात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका श्वानाला एक व्यक्ती मारहाण करताना दिसत आहे.

अभिनेता रितेश देशमुख ने सुद्धा या व्हिडिओवर आपला राग व्यक्त केला होता. त्यानंतर आता ठरलं तर मग या मालिकेतील मुख्य अभिनेत्री जुई गडकरी ने सुद्धा आपला इंस्टाग्राम पोस्टमार्फत या व्हिडिओवर रोष व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा एका स्पा मधील व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनलाय. व्हिडिओ बद्दल जुई म्हणाली की, ”एका स्पा सेंटर मध्ये श्वानाला कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खूप अस्वस्थ करणारा आहे. मी तो व्हिडिओ पूर्ण पाहू देखील शकले नाही. मारहाण करणाऱ्या त्या मनोरुग्णाला देव चांगलीच शिक्षा करो.”(entertenment news)

”ज्या हाताने त्याने मुक्या जीवाला मारहाण केली ते हात काही दिवसांनी कामच करणार नाहीत…. कृपया हा अत्याचार थांबवा आणि त्या कर्मचाऱ्याला अटक करून कठोर शिक्षा द्या. तो श्वान सुरक्षित असू देत…. कृपया तुमच्या प्राण्यांना अशा क्लिनिक किंवा स्पा सेंटरमध्ये एकटं पाठवू नका.”

रितेश आणि जुईने या व्हिडिओबद्दल आवाज उठवल्यावर इतर सोशल मीडिया वापर करते देखील यावर संताप व्यक्त करत आहेत तसेच काही जण हा व्हिडिओ मुंबई पोलिसांना टॅग करून त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *