राज्यात आणखी एका राजकीय भूकंपाची शक्यता

(political news) आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजपकडून मोर्चेबांधणी सुरु असून विरोधी पक्षातील काही मोठ्या नावांना पक्षात सहभागी करून घेण्याचं सत्र अद्यापही सुरुच आहे.

काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षासोबत असणारं इतक्या वर्षांनं नातं तोडत कमळाची साथ दिली. चव्हाणांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री आणि राज्यातील दिग्गज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या’ हे सूचक वक्तव्य केलं होतं. इथं फडणवीसांच्या या वक्तव्यानं नजरा वळवलेल्या असतानात राज्यात आणखी एका राजकीय भूकंपाची चिन्हं अगदी स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार भाजपकडून काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का देण्याचा प्रयत्न सुरु असून, यावेळी मुंबईमधील माजी खासदार भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसमध्ये गेल्या कैक वर्षांपासून राजकीय कारकिर्द पुढे नेणारे हे खासदार आहेत संजय निरुपम. काँग्रेसमधील एक मोठं नाव आणि मुंबईतील राजकारणासाठीची एक अनुभवी व्यक्ती म्हणून पक्ष निरुपम यांच्याकडे पाहत असतानाच त्यांनीही आता भाजपची वाट धरली तर, काँग्रेसपुढं मोठी अडचण उभी राहणार आहे. (political news)

गेल्या काही दिवसांपासून संजय निरुपम पक्षावर नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. परिणामी संजय निरुपम यांना पक्षातून उमेदवारी देत काँग्रेसला धक्का देण्याची भाजपची तयारी असल्याचं म्हटलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *