आ. सतेज पाटील व आ. रोहित पवार यांच्यातील संवाद व्हायरल
कोल्हापुरात कुणाला निवडून आणायचे हे कधीच ठरविले जात नाही, तर कोणाला पाडायचे हे ठरविले जाते हा सतेज पाटील आणि रोहित पवार या दोन आमदारांमध्ये विधानभवनाच्या प्रांगणात झालेला अनौपचारिक संवाद व्हायरल झाला आहे. बुधवारी कोल्हापुरात हा चर्चेचा (discussion) विषय ठरला होता.
विधानभवनात पाटील व पवार यांची भेट झाली. पाटील यांना पाहताच पवार यांनी ‘काय कोल्हापूर’, असे म्हणत ‘तुमचं बरं आहे, कुणाला पाडायचे याचीच चर्चा होते. कंडका पाडायचा, अशी भाषाही रंगते.’ निवडून आणण्यापेक्षा पाडण्याची चर्चा (discussion) हे वेगळेपण असल्याचे पवार म्हणाले. त्यावर सतेज पाटील यांनी, ‘तुम्ही पाच वर्षांपूर्वीचं सांगताय’, असे म्हणत ही चर्चा हसण्यावर नेली. मुंबईत घडलेल्या या घटनेची चर्चा मात्र कोल्हापुरात दिवसभर सुरू होती.