सध्या सर्वत्र चर्चा फक्त आणि फक्त समीर वानखेडे यांच्या वक्तव्याची

(entertenment news) आयआरएस अधिकार समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. आर्यन खानच्या अटकेवर समीर वानखेडे यांनी पहिल्यांदा मौन सोडलं आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत समीर वानखेडे यांनी कुटुंब आणि आर्यन खान केस यावर मोठं वक्तव्य केलं. आर्यन खानची केस ज्याप्रकारे हाताळली त्यावर कधी पश्चाताप होतो का? असा प्रश्न समीर वानखेडे यांना विचारण्यात आले.

विचारण्यात आलेल्या प्रश्नावर समीन वानखेडे यांनी रोखठोक उत्तर दिलं. ‘मला फक्त दोन लोकांना माझं तोंड दाखवायचं असतं. ईमेज वैगेर मोठ्या लोकांसाठी असते. मला याचा काहीही फरक पडत नाही. लोकांसाठी बोलणं फार सोपं असतं की फक्त पैशांसाठी काम करत आहे. लाच घेत आहे, भ्रष्टाचार करत आहे. मी कोणाला मनवण्यासाठी किंवा कोणाला स्पष्टीकरण देण्यासाठी काम कधीच करत नाही.’

‘माझे स्वतःचे विचार आहे. माझ्या आतली गोष्ट आहे. माझ्या मनातील गोष्ट आहे. प्रत्येक हेतू पैसा आणि घाणेरड्या कामाचा नसतो. आजही काही अधिकारी चांगले आहेत. आजच्या घडीला अशा काही व्यक्ती आहेत, ज्यांचा हेतू फक्त पैसे कमावणं नाही. लोकं राष्ट्राच्या सेवेसाठी काम करतात. प्रत्येक गोष्टीचा संबंध पैशांसोबत जोडणं चुकीचं आहे.’ असं समीर वानखेडे म्हणाले.

पुढे समीर वानखेडे यांनी सरकारी मंत्रालये आणि मंत्रालयांनी स्थापन केलेल्या तपास समित्या त्यांचे युक्तिवादांबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘मला माझे विचार मांडण्याची एक संधी दिली. ही चांगली गोष्ट आहे. पुढे काय होतं पाहू… माझा न्यायावर विश्वास आहे…’ असं देखील समीर वानखेडे म्हणाले.

एवढंच नाहीतर, दलित समाजातून आल्याने त्यांच्यावर निशाना साधला जात आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी विचारण्यात आला. यावर समीर वानखेडे म्हणाले, ‘मला यावर जरा वेगळ्या पद्धीत उत्तर द्यायचं आहे. कारण हे प्रकरण पटियाला हाऊसमध्ये प्रलंबित आहे. पण एक गोष्ट नक्की सांगेल आपले देव आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर… आपल्या रक्तात ते आहेत. त्यांनी आपल्याला संविधान दिलं. त्यांनी आपल्याला चांगलं राहणं, चांगलं राहणं, चांगले कपडे घालणं, सर्वकाही शिकवलं. ‘(entertenment news)

पुढे समीर वानखेडे म्हणाले, ‘आज मी ज्या स्थानावर आहे, ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे. डोके वर काढण्याचा मान ही आंबेडकरांची देणगी आहे. काही शिवीगाळ किंवा काही त्रास झाला तर ते लढतील…’ असं देखील समीर वानखेडे म्हणाले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त समीर वानखेडे यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *